स्वप्न घेती भरारी… जिद्द असे उरी…!!


अनुदत्त विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील आमचे मित्र रविंद्र पंदारे दहावीला 1998-1999 ला पास होवू शकले नाहीत आणि काही कारणास्तव परत दहावीची परीक्षा द्यायला त्यांना जमलं नाही. मग मिळेल ती काम करत आपलं लग्न सुद्धा केलं. पण मनात शिक्षण पूर्ण करावं हे मनोमन रविला वाटत होतं.

लग्नानंतर संसाराचा गाडा खेचत खेचत दिवस जात होते. लग्नानंतर दोन मुलींचा जन्म झाला मग मनात शिकण्याची इच्छा मनातच राहुन गेली. रवीची मोठी मुलगी नवविला शिकत आहे. यातच रवीला वाटलं आता मुलगी सुद्धा दहावीला जाईल तर का नको या वर्षी मी तिच्या आधी दहावीची परीक्षा देऊन पास होवू नये. म्हणून त्याच्या मनातली ही शिकण्याची इच्छा त्याने त्याच्या जीवनसंगिनीला सांगितली. तसं तिने सुद्धा “दहावीची परीक्षा” देण्यासाठी त्याच्या मताशी सहमत होऊन होकार दिला.

घरातील सर्वांनी त्याचे मनोबल वाढवले. मनात जर खरंच एखादी गोष्ट करायची ईच्छा असेल आणि ती करायची “जिद्द” जर मनात असेल तर मग त्यात आपण कितीवेळा “अपयश” मिळवतोय हे महत्वाचे नाही.

अपयशाला हरवून “रविंद्र पंदारे” या मित्राने आज “25 वर्षा” ने का होईना त्याचं राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं आणि आज तो “दहावी पास” झाला.

Advertisement

येणाऱ्या काळातील विद्यार्थी मित्र – मैत्रिणींनी यावरून एकच बोध घेतला पाहिजे की नापास होणं हे आपल्या काही केलेल्या चुकांच फलित असतं त्यामुळे आपण नाराज होऊन आपले प्राण गमावण्यापेक्षा परत केलेल्या चुकांना सुधारत किंवा परिस्थिती जर वाईट असेल त्यामुळे शिक्षण घेताना हवं तसं अभ्यास न झाल्याने गुण कमी मिळाले म्हणून सुद्धा आपण स्वतःचा जीव देण्याचा विचार करतो.  आपले आयुष्य हे फक्त आपले नसते तर ते संपूर्ण समाजाचे सुद्धा असतें कारण आपण प्रत्येकजण जन्माला येऊन या मानव समाजाचे देणं लागतो आणि ते योग्यरित्या आपल्याला देता यावं म्हणून आपण शिकलं पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने विद्यार्थी आहोत.

म्हणून आज आपले “रविंद्र पंदारे दादा” यांचा आदर्श घेऊया आणि आपले शिक्षण पूर्ण करूया हिच जिद्द आपल्या मनात बाळगूया.
“आपण अनेकदा अपयश पचवून सुद्धा,
शेवटी अपयशाला हरवूया,
यशस्वी होऊनी अपयशातून,
विजय आपण मिळवूया…!!

माझे मित्र “रविंद्र पंदारे” यांना दहावी पास झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील शिक्षणासाठी मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा…!!

शुभेच्छुक,
विजय उत्तमबाई कांबळे
सामाजिक कार्यकर्ता
(युवा भारत संघटना).


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x