६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार


महाराष्ट्रातील जळगावमध्ये ६ वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यामुळे जळगावसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

सहा वर्षांच्या चिमुकलीला तुला खाऊ देतो आणि खेळायला मोबाईल देतो, असं म्हणत नराधमाने अमिष दाखवून तिला शेतात नेण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मात्र घडला प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून या नराधमाने चिमुकलीची हत्या केली.

स्वत:च्या बचावासाठी त्याने या चिमुकलीची हत्या केली अन् या सगळ्यानंतर स्वत: मात्र पळून गेला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेवर संताप व्यक्त केला जात असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisement

या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या की “या घटनेप्रकरणी आरोपीविरुद्ध अपहरणाचा कलम तसेच खुनाच्या कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीच्या अटकेसाठी तब्बल दहा पथक जवळपासच्या जंगलासह विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत”, असं त्यांनी सांगितलं.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x