चुरशीच्या लढतीत वायकरांचा ४८ मतांनी विजय


यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात अत्यंत मोठ्या फरकाने आघाडी-पिछाडी पाहायला मिळाली आहे. तर काही ठिकाणी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघामधे अमोल गजानन कीर्तिकर (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि रविंद्र वायकर (शिवसेना) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या मतदारसंघात सुरुवातीला अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले. परंतु शिवसेनेचे रविंद्र वायकर यांनी फेरमतमोजणी करावयास सांगितले. फेरमतमोजणी नंतर रविंद्र वायकर यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले. अमोल गजानन कीर्तिकर यांना एकूण (४,५२,५९६) इतकी मते मिळाली तर रविंद्र वायकर यांना एकूण (४,५२,६४४) इतकी मते मिळाली. फेरमतमोजणी नंतर रविंद्र वायकर यांचा अवघ्या ४८ मतांनी विजय झाला आहे.

Advertisement

लोकसभा निवडणूक निकालात महाराष्ट्रात महाविकास आघाडीने ३० जागांवर विजय मिळवला आहे. तर महायुतीला १७ जागांवर विजय मिळविण्यात यश आले आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x