IAS अधिकाऱ्याच्या लेकीची आत्महत्या
मुंबईमधील एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या करत आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. ०३ जून रोजी मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला.
दरम्यान, मंत्रालयासमोरील एका इमारतीवरुन तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? हे स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहिलेली आहे.
IAS अधिकारी विकास रस्तोगी यांची मुलगी लीपी रस्तोगीने ०३ जून रोजी मध्यरात्री मंत्रालयालसमोरील सुनीती या इमारतीवरुन उडी मारली. आत्महत्या केल्यानंतर लीपी खाली उभी असलेल्या एका मोटरसाईकल वर कोसळली. जीवन संपवण्याआधी तिने एक चिठ्ठी देखील लिहिली होती.
समोर आलेल्या माहितीनूसार मृत मुलगी ही २७ वर्षांची असून ती LLB चे शिक्षण घेत होती. शिवाय आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहिल्याचं म्हटलं आहे. मंत्रालयासमोरील सुनीती इमारतीच्या १० व्या मजल्यावरुन एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीने जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे.





