“अजित पवारांची नार्को टेस्ट करा”


पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. अटकेनंतर अवघ्या काही तासांतच ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन आरोपीचा जामीन मंजूर झाला. या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता.

याप्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली होती. या अपघात प्रकरणानंतर अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अनेक फोन केले होते. मी हे अनेक पत्रकारांच्या समाज माध्यमांवरील पोस्ट आणि प्रसारमाध्यमांवरील बातम्यांच्या आधारे बोलत आहे. अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केल्याची शंका माझ्याही मनात होती. तसेच ते अनेक दिवस या प्रकरणावर काहीच बोलत नव्हते, असंही त्या म्हणाल्या.

पुण्यातील अपघात प्रकरणानंतर होऊ लागलेल्या आरोपांवर अजित पवार  खोटी उत्तरं देत आहेत. अजित पवार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अजित पवारांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करायला हवी, असं त्या म्हणाल्या.

Advertisement

तुमचे विशाल अग्रवालचे संबंध नसतील, तुमचे आर्थिक व्यवहार नसतील आणि तुमच्या नार्को टेस्टमध्ये तुम्ही क्लीन आला तर मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे, मी संन्यास घेईन. मी कुठलाही सामाजिक विषय कधीही लढणार नाही, असं आव्हान त्यांनी अजित पवारांना दिलं. यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

माझी नार्को टेस्टची तयारी आहे. त्या चाचणीत काही आढळलं नाही तर अंजली दमानिया यांनी पुन्हा कुठे पुढे यायचे नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा, असं उत्तर अजित पवारांनी दिलं आहे.

दरम्यान अंजली दमानिया यांनी पुन्हा अजित पवारांना उत्तर दिलंय. मी तुमचं आव्हान स्वीकारत आहे. त्यात तुम्ही दोषी आढळल्यास काय करणार, हे सांगा. तुम्ही दोषी आढळले नाही तर तुमच्या मागणीप्रमाणे मी घरी बसून राहील, असं त्या म्हणाल्या.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x