भुजबळांचा आव्हाडांना पाठिंबा


राज्य  सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याबाबत निर्णय घेतला. याला राज्यातून विरोध करण्यात आला आहे. महाडच्या चवदार तळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केली. तेव्हा मनुस्मृतीचे पोस्टर फाडत असताना त्यांच्याकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाटलं गेलं. यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं. यामुळे कालच जितेंद्र आव्हाड यांनी माफी देखील मागितली आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाडांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी बाजू घेतली आहे.

मात्र अशातच आता छगन भुजबळ यांनी आव्हाडांबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. जितेंद्र आव्हाडांची भूमिका चांगली होती. फोटो फाटल्याबद्दल त्यांनी माफी मागितली, याप्रकरणामुळे भुजबळ यांनी पडदा टाकण्याचा सल्ला दिला आहे.

Advertisement

जितेंद्र आव्हाड हे चांगल्या भावनेने महाडला गेले होते. त्यांच्या हातून चुकून फोटो फाटला गेला. त्यांनी यानंतर माफी देखील मागितली आहे. आपण यामागची त्यांची भावना देखील समजून घ्यावी, असं तरी मला वाटतं, असं छगन भुजबळ म्हणाले.

पुढे ते म्हणाले, विरोधी पक्षातील आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप करण्यात काहीही हरकत नाही. आम्हाला शिक्षणामध्ये मनुस्मृती नकोय, बहुजन समाजातील दलित, मराठा, ओबीसी, ब्राह्मण, महिला आणि मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे आहेत, त्या सर्वांनी मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात चंचूप्रवेश नको, याकडे लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर आपलं लक्ष भलत्याच ठिकाणी केंद्रीत होईल, असं भुजबळ म्हणाले आहेत.

मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी सरकाने निर्णय घेतला आहे. मात्र याला आता छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, तसेच समता परिषदेने विरोध केला आहे. याचपार्श्वभूमीवर आव्हाड महाडच्या चवदार तळे येथे गेले असता तिथे हा प्रकार घडला.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x