“मी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागतो”- आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज बुधवार (२९) मे रोजी महाडच्या चवदार तळे येथे मनुस्मृतीचे दहन केले. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एवढंच नाहीतर आता मनुस्मृतीचे पोस्टर फाडत असताना त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाटले गेले असल्याचं स्वत: जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. त्यासंदर्भात मी महाराष्ट्राच्या जनेतेची माफी मागतो, असं आव्हाड म्हणाले.
आम्ही मनस्मृतीचे दहन करण्यासाठी आलो होतो. कारण ज्या मनुस्मृतीत महिलांविषयी अत्यंतं खालच्या भाषेत लिहिण्यात आलं होतं. त्या मनुस्मृतीचे जे काही श्लोक आहेत ते पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात येणार असल्यास आम्ही त्याचा विरोध करत आहोत.
जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे पोस्टर फाडतेवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील पोस्ट फाडलं त्यावर आता अमोल मिटकरी यांनी आव्हाड यांना सुनावलं आहे. “जाहीर निषेध! जाहीर निषेध! स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये, आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी”, असं अमोल मिटकरी यांनी ट्विट करत आव्हाडांवर हल्लाबोल केला.
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश केला जाणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला. याविरोधात छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यापासून विरोध केला. त्यानंतर समता परिषदेने देखील याविरोधात आवाज उठवला.





