कॅफेत रंगला इश्काचा खेळ


विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातून नवनवीन खुलासे समोर येत आहेत. यासंदर्भात पुणे पोलीस देखील सखोल कारवाई करत आहेत. मात्र या सर्व घटनेमुळे पुण्यातील पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. अशातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पुणे पोलिसांनी एका कॅफेवर आणि लॉजवर छापा टाकल्याची घटना समोर आली आहे. यावेळी त्या ठिकाणी असलेले भयावह वास्तव समोर आलं आहे. पोलिसांना या कॅफेवर टाकलेल्या छाप्यामध्ये कॉलेजमधील तरुण-तरूणी तिथे नको त्या अवस्थेत दिसले आहेत. त्यावेळी असे दिसून आले की, कॅफेच्या नावाखाली इश्काचा खेळ रंगताना दिसला आहे. त्यामुळे पुण्यात या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

प्रशासनाच्या नियमांनुसार लॉजमध्ये जाण्यासाठी ओळखपत्र दाखवावं लागत असल्यामुळे हे तरुण-तरुणी कॅफेकडे वळली आहेत. काहींनी तर हा व्यवसायच सुरू केला आहे. कॅफेच्या नावाखाली युवा तरुणांना प्रवेश दिला जातो. प्रत्येक जोडप्यासाठी विशेष सोय देखील उपलब्ध करून देण्यात येते. ओळखपत्र न दाखवता प्रवेश मिळत असल्याने जोडपी जास्तीचे पैसे देण्याची देखील तयारी दर्शवतात. पण कॅफे चालकांना कारवाईची भीती का नाही? असा प्रश्न समोर येत आहे.

Advertisement

पुणे येथील राजगुरुनगर शहरातील लॉज आणि कॅफेवर राजगुरुनगर पोलीसांनी अचानकपणे छापासत्र सुरु केलं. त्यावेळी राजगुरूनगर पोलिसांना कॉलेजमधील तरूण-तरूणींना अश्लिल प्रकार करत असताना आढळुन आली आहेत. यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कॅफेच्या नावाखाली अंधार करुन महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा हा अश्लिल प्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे.

सध्या पुणे शहरातील पब व बार प्रकरणांनंतर पुण्याच्या ग्रामीण भागात लॉज आणि कॅफेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थांना प्रवेश देऊन अश्लिलतेचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. या सर्व घटनेनंतर राजगुरुनगर पोलीसांनी राजगुरुनगर नगरपरिषद प्रशासनासोबत संयुक्त कारवाईला सुरूवात केली आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x