उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यात महिलेवर बलात्कार
माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यातुन समोर आली आहे. एक महिला मौलवीकडे आपल्या उपचारासाठी गेली असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मौलवीकडे उपचारासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करून तिचा व्हिडीओ देखील काढण्यात आला, असा धक्कादायक आरोप पीडित महिलेने केला आहे.
उपचारासाठी आलेल्या पीडित महिलेला त्याने एका खोलीत घेऊन जाऊन तिथं तिच्यावर बलात्कार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिला बिजनौरची आहे. मागच्या आठवड्यात महिलेने सीनियर पोलीस अधिकाऱ्याकडे याची तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार दर्ग्याच्या ठिकाणी ओढणी आणि चादरीचं दुकान असलेल्या ठिकाणी मौलवीने तिला उपचाराचं आश्वासन दिलं आणि उपचाराचे कारण सांगून त्या महिलेला तो खोलीत घेऊन गेला. त्यावेळी मौलवीने तिच्यावर बलात्कार केला. कोतवाली क्षेत्रात बदायू-दिल्ली मार्गावर सोत नदी किनाऱ्यावर ‘बड़े सरकार’ चा प्रसिद्ध दर्गा आहे या ठिकाणी मानसिक आजारांवर झाड-फूंकच्या माध्यमातून उपचार घेण्यासाठी अनेक लोकं लांबून याठिकाणी येत असतात.
उपचार करतो असं सांगून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा दावा पीडित महिलेनं केला आहे. तर तिचा व्हिडीओ देखील शूट करण्यात आल्याचा धक्कादायक दावा पीडित महिलेचा आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.





