राऊतांचा मोदींवर हल्लाबोल


देशातील लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यातील रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते एकमेकांवर शाब्दिक प्रहार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हटलं होतं. इतकंच नाही तर, नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकविल्याचा आरोप देखील मोदींनी केला होता. त्याला आता ठाकरे गटाकडून जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलंय.

ठाकरे गटाचे नेते  खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी होर्डिंगचा मुद्दाही समोर आणत भाजपवर टीका केली. ज्या रस्त्यावर लोकांचा मृत्यू झाला तिथे पंतप्रधानांनी रोड शो केला, असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला.“..यासारखी अमानुष गोष्ट नाही”

एका माणसाचा प्रचार सुरळीत व्हावा यासाठी लोकांच्या गैरसोय करणारा पंतप्रधान पहिल्यांदा पाहिला. मोठा होर्डिंग पडून ज्या ठिकाणी सतरा लोकांचा जीव गेला त्या ठिकाणी प्रधानमंत्री रोड शो करतात. यासारखी अमानुष गोष्ट नाही. हे सगळं कोणासाठी? अशा प्रकारचा प्रचार देशात कधी झाला नव्हता. असे कोणतेही पंतप्रधान या आधी आम्ही पाहिले नाहीत”, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

Advertisement

मोदींच्या रोड शोमुळे मुंबईत नोकरदारवर्गाचे प्रचंड हाल झाले. मेट्रो सेवा खंडित झाल्याने घाटकोपर स्थानकावर चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तर, दोनच दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामुळे घाटकोपरमध्येच काही जणांचा मृत्यू झाला. यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पैसा फेको तमाशा देखो हाच यांचा जाहीरनामाआहे. हेलिकॉप्टरमधून खोके पेटी उतरवायच्या, पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे, लाखो मते विकत घेण्याच्या योजना करायच्या, रेटून खोटं बोलायचं हाच त्यांचा जाहीरनामा. त्यामुळे नव्याने जाहीरनामा करण्याची त्यांना गरज नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की, “ज्यांनी पक्ष चोरला तेच इतरांना चोर बोलत आहेत. चोर कोण आहे? चोराला मदत कोणी केली? चोराला मदत करणारे पंतप्रधान, गृहमंत्री, निवडणूक आयोग हे चोरांचे सरदार आहेत. म्हणून आम्हाला देशात परिवर्तन आणायचं आहे”, असंही संजय राऊत म्हणाले. तसंच, “पक्ष आम्ही सांभाळला आहे, ४ जूनला कळेल की शिवसेना, राष्ट्रवादी कोण आहे?”, असं राऊत म्हणाले.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x