“कांदिवलीतील वॉर्ड २७ मध्ये विकासकामांचा वेग; आमदार अतुल भातखळकर यांच्या निधीतून ड्रेनेज व लादीकरण प्रगतीपथावर”


मुंबई: निर्भीड समाचार News Desk

कांदिवली पूर्व येथील वॉर्ड क्रमांक २७ मध्ये विकासकामांनी वेग घेतला आहे. मा. आमदार अतुल भातखळकर यांच्या विशेष विकास निधीतून म्हाडा रोड क्र. १, सोसायटी क्रमांक १८ येथे लादीकरण (Paving) आणि नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

 

या विकासकामांची पाहणी करण्यासाठी वॉर्ड क्र. २७ चे शाखाप्रमुख रवी विश्वकर्मा यांनी नुकतीच प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेची (Quality Check) सखोल पाहणी केली आणि संबंधित कंत्राटदाराकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. काम लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Advertisement

गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना ड्रेनेज आणि रस्त्यांच्या समस्यांचा सामना करावा लागत होता. आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रश्नाची दखल घेत निधी उपलब्ध करून दिल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना रवी विश्वकर्मा म्हणाले की, “स्थानिक नागरिकांना अधिक चांगल्या आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात, हा आमचा मुख्य उद्देश आहे. आमदार अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्डाचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

या पाहणी दरम्यान स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामामुळे परिसरातील स्वच्छतेचा आणि पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x