“देगलूर (जि.नांदेड): नगरसेवक सुमंत कांबळे व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने राष्ट्रसंत गाडगे बाबा सभागृह परिसराची स्वच्छता”


देगलूर (प्रतिनिधी):

स्वच्छतेचे अग्रदूत राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून देगलूर येथील वॉर्ड क्रमांक १०, भायेगाव रोड भागातील गाडगे बाबा सभागृह परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जेसीबीच्या साहाय्याने परिसरातील कचरा आणि घाण साफ करून परिसर चकाचक करण्यात आला.


‘स्वच्छता हीच ईश्वर सेवा’ हा संदेश देणाऱ्या गाडगे बाबांना त्यांच्याच जयंती दिनी कृतीतून अभिवादन करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभाग नोंदवला.

Advertisement

या स्वच्छता मोहिमेवेळी दिगंबर कौरवार, नगरसेवक सुमंत कांबळे, साई गंदपवार, गजू कांबळे, दिगंबर दाउबे, इबितवार सर, साई बोन्लावार, महेश वाघमारे, राहुल इबितवार आणि योगेश मैलागिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी यावेळी गाडगे बाबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, केवळ जयंतीपुरते मर्यादित न राहता कायमस्वरूपी स्वच्छता राखण्याचा संकल्प केला. वॉर्डातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, यामुळे परिसरात आरोग्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x