वाईन आणि स्पिरिट विदेशी मद्य विक्रिच्या दुकानासमोर खुल्या बारला मनसे दिंडोशी विधानसभा सचिव श्री. राकेश धनावडे यांची समज..!!


मुंबई : समता नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या क्रांती नगर, लोखंडवाला रिक्षा स्टँड येथे रस्त्यावर काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोशी विधानसभा सचिव राकेश धनावडे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह रस्त्यावर चालू असलेल्या खुल्या बार आणि वाईन आणि स्पिरिट विदेशी मद्य विक्रीच्या दुकाना विरोधात सामाजिक भावनेतून आंदोलन केले होते. खुले आम रस्त्यावर तरुण वर्ग असो वा वृद्ध सगळे त्या ठिकाणी मद्य प्राशन करत. मद्य प्राशन केल्यानंतर त्या ठिकाणा वरुन येणाऱ्या जाणाऱ्या महिला आणि मुली यांची छेड काढणे आणि नको ते कमेंट्स करणे असले प्रकार चालू होते. याची तक्रार राकेश धनावडे यांच्या कडे गेली असता त्यांनी आंदोलन केले आणि त्यांना समज दिली. काही दिवस हा प्रकार बंद होता. पण परत तोच प्रकार पुनः चालू असल्याचे राकेश धनावडे यांच्या निदर्शनास आले. परत त्यांनी त्यांना समज दिली.

Advertisement

मुळात नेमका मुद्दा हा आहे की हे सर्व कोणाच्या संगनमताने चालू आहे? कोण यासाठी जबाबदार आहे? कोण यांची पाठराखण करत आहे? तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत चालली आहे याला जबाबदार कोण? उद्याचे भविष्य घडण्याआधीच संपत चालली आहे याला जबाबदार कोण? पोलिस वाले हफ्ता घेऊन यांना मदत करतात यामधे काही दुमत नाही. पण पोलिसांना आर्डर देणारे कोण याचा देखील शोध लागणे गरजेचे आहे असे आपण म्हटले तरी सध्या राज्यात हुक़ूमशाही सुरु आहे असेच दिसून येते. स्थानिक नेत्याच्या सहकार्याने नागरिकांना त्रास देण्यात येत आहे.

वाईन आणि स्पिरिट या वाईन शॉप वाल्याच्या मागे कुठल्या पक्षाचा नेता आहे, हे लवकर जाहीर करणार असे राकेश धनावडे यांचे म्हणणे आहे.

गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या स्वतःच्या हद्दीतील समता नगर पोलिस ठाणेच्या हद्दीत असा प्रकार घडत असेल तर महाराष्ट्र खरंच सुरक्षित आहे का…

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिस प्रशासनावर पकड नसल्याचे या घटनेतून दिसून येते


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x