दिंडोशीत आमदार राजहंस सिंह यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन..!!
मुंबई : आमदार विकास निधीच्या माध्यमातून रविवार, २३ नोव्हेंबर रोजी दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील त्रिवेणी नगर मंडळाच्या वॉर्ड क्रमांक ४२ मधील विविध भागांमध्ये लादीकरण, शौचालय नूतनीकरण, गटारे व काँक्रीटीकरण, सभामंडप इत्यादी ८ नागरी विकासकामांचे भूमिपूजन आमदार राजहंस सिंह यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.
Advertisement
दिंडोशी मधील विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. याप्रसंगी दिंडोशी मंडळ संयोजक राजन सिंह, मंडळ अध्यक्ष युवराज बनसोडे सहित भाजपा दिंडोशी मधील मुंबई, जिल्हा, मंडळ, वॉर्ड तसेच मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागोजागी स्थानिक नागरिकांनी राजहंस सिंह यांचे स्वागत केले आणि आभार व्यक्त केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.





