पिंपळगाव बसवंत मधील सभेत शेतकऱ्यांचा मोदींना कांदाप्रश्न


लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी नाशिक आणि दिंडोरीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पिंपळगाव बसवंत येथे त्यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी मोदींची सभा चांगलीच गाजली.

परंतु मोदींचे या सभेतील भाषणादरम्यान अचानक थांबले. मात्र त्यावेळी अनेकांना मोदी भाषण करता करता का थांबले याचे नेमकं कारण कळत नव्हतं. मात्र त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांनी “मोदीजी आता कांद्यावर बोला” अशी घोषणाबाजी सुरु केली.

मात्र त्यावेळी पोलिसांनी वातावरण शांत करून मोदींनी पुन्हा एकदा भाषणाला सुरुवात केली. मोदींची ही सभा नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे, दिंडोरी मतदारसंघाच्या भाजप उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीसह शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर हल्लाबोल केला आहे.

Advertisement

मोदींनी आपल्या भाषणा दरम्यान नकली राष्ट्रवादी काँग्रेस आणि नकली शिवसेना असा उल्लेख करत ते काँग्रेसमध्ये विलीन होतील असे म्हटले आहे. त्यावेळी लोक मोदी-मोदी घोषणा देऊ लागले. पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरु असताना अचानक प्रेक्षकांमधून “मोदीजी आता कांद्यावर बोला” अशी घोषणाबाजी दिल्या आहेत.

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम अशा घोषणा देत प्रेक्षकांना प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर आपल्या योजनांची माहिती द्यायला लागले आणि कांदा उत्पादकांसाठी आपण काय काय केले हे देखील त्यांनी सांगितले आहे. परंतु मोदींनी शेतकऱ्यांनी दिलेल्या घोषणा ऐकताच आपलं भाषण लवकर आवरतं घेतलं.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x