क्रांती नगर येथील भाजी मार्केट मधे अनाधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिकांचे हाल..!!


मुंबई : कांदिवली पूर्व येथील क्रांती नगर या ठिकाणी असलेल्या भाजी मार्केट मध्ये परप्रांतीय भाजीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. क्रांती नगर हे कांदिवली पूर्व मधील दाट लोकवस्ती असलेले ठिकाण आहे. हा संपूर्ण भाग स्लम म्हणून घोषित झालेला आहे. या ठिकाणी असलेल्या भाजी मार्केटचे स्वरूप खूप व्यापक आहे. या दाट वस्तीत राहणारे लोकं आणि बाजूलाच लागून असलेल्या लोखंडवाला परिसरातील लोकं या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी येतात. या ठिकाणातील नव्वद टक्के भाजीवाले हे परप्रांतीय आहेत. पूर्वीच्या लोकसंख्येच्या मानाने आताच्या भाजीवाल्यांची संख्या ही तिप्पट झाली आहे. क्रांती नगरचा हा मुख्य रहदारीचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते. याच विभागात बऱ्याच शाळा देखील आहेत. त्यामुळे पाल्यांना शाळेत सोडण्यास येणाऱ्या पालकांची संख्या देखील तितकीच आहे.

सायंकाळी ४ वाजल्यापासून ते रात्री ११ ते ११:३० पर्यंत हे भाजी मार्केट चालू असते. सायंकाळी ६ वाजल्यापासून ते ९:३० च्या दरम्यान लोकांना घरी जाण्यासाठी या मुख्य रहदारीच्या रस्त्यावरून चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. कारण भाजीवाले त्यांच्या गाड्या रस्त्याच्या मधोमध कशाही प्रकारे रस्त्यावर उभ्या करतात. त्यांना कोणी काही बोलले तर लगेच भांडण करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. कित्येक वेळा तर भाजीवाले आणि नागरिकांमध्ये मारामारी झाल्याचे उदाहरणे आहेत. या भाजीवाल्यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही. पालिकेची गाडी कधीच या रस्त्यावर दिसत नाही. हे सगळे फेरीवाले अनाधिकृतपणे रस्त्याच्या दुतर्फा आपल्या गाड्या लावतात. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तसेच अवजड वाहने ,बाईक आणि ऑटोरिक्षा यांची देखील रेलचेल असते.

Advertisement

एखादी व्यक्ती जर आजारी असेल आणि त्याला जर का ऍम्ब्युलन्स ने दवाखान्यात न्यावयाचे असेल तर त्याला दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा जीव निघून जाईल कारण या गर्दीतून निघण्यासाठी त्याला जागाच मिळणार नाही. मात्र पालिका प्रशासन याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी असलेल्या भाजीवाल्यांना कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत कि कसलेही बंधने नाहीत. त्यामुळे यांचा मुजोरपणा दिवसेंदिवस वाढत आहे. यांनी आपले एक प्रकारचे संघठनच बनवले आहे. जर एखाद्या भाजीवाल्याशी कोणी वाद केला तर लगेच त्याची बाजू घ्यायला दुसरा तयार असतो. यांच्या अशा मुजोरपणामुळे सामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. या सर्व लोकांचे हफ्ते पालिका प्रशासनाला जात असल्यामुळे पालिका प्रशासन यांच्यावर कडक कारवाई करेल का?  कारण पालिका प्रशासनाची गाडी ही चुकून माकून आलीच तर ती लोखंडवाला सर्कल ते क्रांती नगर रिक्षा स्टॅन्ड पर्यंतच येते. त्यामुळे नागरिकांची समस्या पाहता पालिका प्रशासन यांच्यावर कारवाई करेल की नाही हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
गजानन तुकाराम सोनकांबळे
गजानन तुकाराम सोनकांबळे
1 year ago

क्रांती नगरातील भाजी मार्केट वरती कालची कारवाई झाली त्या पद्धतीची कारवाई कायमची झाली तरी दुकानदारांना चांगला धडा शिकला जाईल तसेच रस्ता अडून धंदा करण्यासाठी योग्य कार्यवाही करता येईल धन्यवाद आपल्या चॅनेलचे आणि आपले मित्र एडवोकेट दीपक जगदीश साहेब यांचे पण

आपल्या वृत्तपत्रिका मध्ये आमच्या कंपनीच्या जाहिराती घ्याल का त्या संदर्भातील खर्चाबाबत माहिती मिळेल का धन्यवाद आपला मित्र

Translate »
error: Content is protected !!
1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x