खरे आरोपी सापडले नाही म्हणून कस्तुरबा पोलीसांचा एका 16 वर्षीय नाबालिक विद्यार्थीला आरोपी बनवून मारहाण व लैंगीक अत्याचार..!!


मुंबईतील कस्तुरबा पोलीस ठाणे बोरिवली येथील एक विडिओ सोशल मीडिया वर वायरल होत आहे. दि. १३/०२/२०२५ रोजी पियुष नावाचा १६ वर्षीय नाबालिक कॉलेज विद्यार्थी आपल्या कॉलेज मधून सुटून दुपारी दोन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान बस स्टॉपवर घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभा होता. तेव्हा काही गुंडे २ मोटर सायकलवर येवून पियुषला त्याचे नाव व जात विचारून त्याला धमकी देवून बाईकवर बसवून त्याचे अपहरण करून दौलत नगर येथे घेवून गेले. त्याठिकाणी जाऊन तेथे १० ते १५ लोक व एक महिला त्या विद्यार्थ्याला मारहाण करतात व त्याचा विडिओ बनवतात. त्यानंतर त्याला कस्तुरबा पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले. पोलीसांना खरे आरोपी मिळत नव्हते म्हणून कोणतीही चौकशी न करता PSI अमित शिंदे व PI जयमाला वसावे यांनी विद्यार्थीला ताब्यात घेवून गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी बनवून एका खोली मध्ये घेवून जाऊन मारहाण केली.

Advertisement

PSI अमित शिंदे यांच्या सोबत २ पोलीस शिपाई यांनी विद्यार्थीवर लैंगीक अत्याचार केला. त्यानंतर सायंकाळी पाच च्या दरम्यान पियुषची आई पोलीस ठाणेस आली असता जबरदस्ती तिला सही करून आरोपीला कोर्टात हजर करा अशी नोटीस देतात. सही नाही केल्यास पियुषला सोडणार नाही अशी धमकी दिली. तेव्हा घाबरून पियुषच्या आईने सही करून आपल्या मुलाला सोडवले व त्याची वैद्यकीय चाचणी करुन औषध उपचार करून घरी घेवून गेली. त्यानंतर पियुषच्या आईने वकील दीपक जगदेव यांच्याशी संपर्क केला. सर्व घडलेला प्रकार सांगितला तेव्हा तात्काळ दीपक जगदेव यांनी पियुषला अपहरण करून मारहाण करणारे १५ गुंडे व PSI अमित शिंदे तसेच PI जयमाला वसावे यांच्या विरुद्ध POCSO तसेच ऍट्रॉसिटी नुसार कारवाई करण्यासाठी दहिसर पोलीस ठाणे तसेच DCP स्मिता पाटील मॅडम यांना लेखी तक्रार केली आहे.

मुंबई मध्ये सुद्धा असे प्रकार घडत आहेत ही फार गंभीर बाब आहे असे वकील दीपक जगदेव यांनी सांगितले तसेच या पोलीस अधिकारीला निलंबित करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x