मंत्री आलमगीर आलम यांना ईडी कडून समन्स
झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांना ईडीने समन्स जारी केले असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी आलम यांचे अधिकारी संजीव लाल आणि सहाय्यक जहांगीर आलम यांच्या घरातून कोट्यवधींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. ईडीने ७ मे रोजी संजीव लाल आणि जहांगीर आलम यांना अटक केली. सध्या दोघेही ईडीच्या कोठडीत आहेत.
Advertisement
या नंतर आलमगीर आलम ईडीच्या रडारवर आले आहेत. ईडीने याप्रकरणी १४ मे रोजी आलमगीर आलम यांना रांची मधील ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे आलमगीर आलम यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.





