मरोळमध्ये जागा बळकावण्याचा प्रयत्न; रिपाई नेत्यावर गुन्हा दाखल
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
मुंबईसारख्या महानगरामध्ये जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना, मोक्याच्या ठिकाणच्या खाजगी मालमत्तांवर राजकीय वरदहस्ताने किंवा बळाचा वापर करून ताबा मिळवण्याचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. अंधेरी पूर्व भागातील मरोळ परिसरात एका मौल्यवान खाजगी भूखंडावर (प्लॉट) जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे ताबा मिळवण्याचा एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी POWAI POLICE STATION त्वरित पावले उचलत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाचे अंधेरी तालुका अध्यक्ष आणि टायगर ग्रुप या सामाजिक संघटनेचे मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे यांच्यासह त्यांच्या १५ ते २० साथीदारांवर रीतसर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे राजकीय पदाचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या भूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, अंधेरी पूर्व येथील मरोळ या अत्यंत गजबजलेल्या आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात एका खाजगी व्यक्तीच्या मालकीचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड आहे. या प्लॉटवर गेल्या काही दिवसांपासून काही स्थानिक भूमाफियांची आणि राजकीय कार्यकर्त्यांची नजर होती. या मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत कोणताही कायदेशीर आधार नसताना केवळ बळाचा आणि राजकीय ताकदीचा वापर करून हा प्लॉट बळकावण्याचा कट रचण्यात आला होता.
या योजनेनुसार, रिपाईचे स्थानिक नेते संजय खंडागळे यांनी आपले प्रमुख सहकारी छोटा कन्ना, मोठा कन्ना आणि सोबत १० ते १५ महिला व पुरुष कार्यकर्त्यांची मोठी फौज घेऊन संबंधित खाजगी जागेवर अचानक हल्ला चढवला. कोणताही पूर्वहेतू नसताना या सर्वांनी मालमत्तेच्या आवारात बेकायदेशीरपणे घुसखोरी केली. तेवढ्यावरच न थांबता, तिथे उपस्थित असलेल्या रखवालदारांना आणि मालकाच्या प्रतिनिधींना धमकावून, शिवीगाळ करत संपूर्ण जागेवर बळजबरीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी तिथे मोठा गोंधळ घातला आणि परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मालमत्तेच्या मूळ मालकाला या बेकायदेशीर घुसखोरीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पवई पोलीस ठाण्यात POWAI POLICE STATION धाव घेतली. तक्रारदाराने दिलेल्या सविस्तर जबाबावरून पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. राजकीय पाठींबा असलेल्या या टोळीचा बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ उधळून लावला.तक्रारीच्या आधारे पवई पोलिसांनी POWAI POLICE STATION मुख्य आरोपी संजय खंडागळे, छोटा कन्ना, मोठा कन्ना आणि इतर अज्ञात १५ कार्यकर्त्यांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवणे, खाजगी मालमत्तेत जबरदस्तीने घुसखोरी करणे, दंगल घडवण्याचा प्रयत्न करणे, धमकावणे आणि शांतता भंग करणे यांसारख्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील अंधेरी आणि पवई परिसरात संजय खंडागळे हा रिपाई (A) चा मोठा चेहरा मानला जातो, तसेच ‘टायगर ग्रुप’ या संघटनेचे मुंबई अध्यक्षपद असल्याने त्याचे अनेक तरुणांवर वर्चस्व आहे. या राजकीय प्रभावामुळे तक्रारदार सुरुवातीला घाबरला होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल केला.
या घटनेमुळे मरोळ आणि अंधेरी परिसरातील भूखंड मालकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. जर सत्ताधारी किंवा मोठ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारीच अशा प्रकारे खाजगी जमिनींवर गुंड आणून ताबा मिळवणार असतील, तर सामान्य नागरिकांच्या मालमत्ता कशा सुरक्षित राहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे कौतुक केले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपींना तात्काळ अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करावी, अशी मागणी केली आहे.
पवई पोलीस POWAI POLICE STATION सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले जात आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, लवकरच या सर्व आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





