दहिसर-बोरिवलीच्या विकासाला नवे बळ; प्रकाश दरेकर यांची प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड..!!


मुंबई : निर्भीड समाचार News Desk

मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर-उत्तर’ (दहिसर) आणि ‘आर-मध्य’ (बोरिवली) प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज उत्साहात पार पडली. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवक मा. प्रकाश दरेकरजी यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे उत्तर मुंबईतील भाजपची ताकद अधिक मजबूत झाली असून, संपूर्ण विभागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीचे औचित्य साधून, भाजपचे सक्रिय नेते गणेश खणकर यांनी प्रकाश दरेकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन दरेकरजींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष साजरा केला.

Advertisement

या प्रसंगी बोलताना गणेश खणकर म्हणाले की, “प्रकाश दरेकरजी यांच्या रूपाने एक अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व प्रभाग समितीला मिळाले आहे. त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आर-उत्तर आणि आर-मध्य प्रभागाचा विकास अधिक वेगाने आणि सुनियोजित पद्धतीने होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाचा फायदा थेट सर्वसामान्य जनतेला नागरी समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणे होईल.”

मुंबई महानगरपालिकेत नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती निवडणुकांमध्ये भाजपने आपले वर्चस्व राखले असून, दरेकर यांची निवड बिनविरोध झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विभागातील रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आगामी काळात दहिसर-बोरिवली परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x