कांदिवलीतील MLRT Gala पायोनियर स्कूल’ची पोलखोल; वह्यांच्या नावाखाली पालकांची दुप्पट लूट!


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

मुंबईतील शिक्षण क्षेत्रात खाजगी शाळांच्या मनमानी कारभाराने आणि व्यावसायिकतेने उच्चांक गाठला आहे. कांदिवली पूर्व येथील ‘एम.एल.आर.टी. गाला पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूल’ (MLRT Gala Pioneer English Medium School, Kandivali East, Mumbai – 400101) या शाळेकडून पालकांची कशाप्रकारे पद्धतशीर आर्थिक लूट केली जात आहे, याचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. सरकारी नियमांना केराची टोपली दाखवत, पालकांना वह्या आणि साहित्य घेण्याची सक्ती करून लाखोंची उलाढाल केली जात आहे. या मनमानी आणि बेकायदेशीर कारभाराविरोधात आता **’निर्भीड समाचार’**ने थेट वस्तूस्थितीच्या भक्कम पुराव्यांसह आणि थेट ग्राहक न्यायालयात (Consumer Court) धाव घेत प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.

‘नवनीत’ व ‘सुंदरम’ विरूद्ध ‘सम्राट’ वह्या; लुटीचे जिवंत गणित!
शाळेकडून पुरवल्या जाणाऱ्या वह्याच्या मुख्य पृष्ठावर ‘PIONEER EDUCATION TRUST – MUMBAI’ असा अधिकृत निळ्या रंगाचा शिक्का आणि बोधचिन्ह (Logo) छापण्यात आले आहे. बाह्य बाजूंस आकर्षक पिवळा रंग आणि संस्थेचे नाव असल्यामुळे पालकांना या वह्या खुल्या बाजारातून खरेदी करता येत नाहीत. शाळा प्रशासनाने भिवंडी (ठाणे) येथील ‘सम्राट बुक इंडस्ट्रीज’ (Samrat Book Industries) या व्हेंडरशी संगनमत करून स्वतःच्या नावाने अवाढव्य एमआरपी (MRP) छापून घेतली आहे.

**’निर्भीड समाचार’**ने गोळा केलेल्या चारही प्रकारच्या वह्यांच्या किमतींची थेट तुलना केली असता, शाळा प्रशासनाचा काळाबाजार उघड झाला आहे:

१) ७२-७६ पानांच्या वहीचा खेळ (थेट १००% म्हणजेच दुप्पट लूट):
• शाळेची ‘सम्राट’ वही: ७६ पानांच्या या वहीवर शाळा प्रशासन आणि त्यांचा व्हेंडर तब्बल ४० रुपये वसूल करत आहे.
• बाजारातील ‘नवनीत’ वही: याउलट, खुल्या बाजारायात अत्यंता नामांकित अशा ‘Navneet’ (नवनीत) कंपनीची तंतोतंत याच आकाराची (18 x 24 cm) ७२ पानांची जंबो वही अवघ्या २० रुपयांना उपलब्ध आहे. (३० ते ४० रुपयांच्या वहीवर स्वतःचा लोगो लावून थेट दुप्पट किंमत वसूल केली जात आहे).

२) १७२ पानांच्या वहीचा खेळ (४०% पेक्षा जास्त महाग):
• शाळेची ‘सम्राट’ वही: १७२ पानांच्या सॉफ्टबाउंड वहीवर शाळा थेट ७० रुपये एमआरपी लावून पालकांना लुटत आहे.
• बाजारातील ‘सुंदरम’ वही: याउलट, बाजारात नामांकित अशा ‘Sundaram’ (सुंदरम) कंपनीची १७२ पानांची दर्जेदार वही अवघ्या ५० रुपयांना मिळते. म्हणजेच प्रतिवही २० रुपये अतिरिक्त उकळले जात आहेत.

प्रत्यक्षात ५० रुपयांच्या वस्तूसाठी ७० रुपये आणि २० रुपयांच्या वस्तूसाठी ४० रुपये उकळणे हा पालकांच्या फसवणुकीचा प्रकार आहे. “आम्ही एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेत नाही,” असा बनाव शाळा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात स्वतःच्या नावाने अवाढव्य एमआरपी छापून घेणे, हा पालकांची फसवणूक करण्याचा प्रकार आहे.

पूर्वकल्पना देऊनही शाळा प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम!
धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाबाबत आणि पालकांच्या होणाऱ्या आर्थिक त्रासाबाबात **’निर्भीड समाचार’**चे पत्रकार किसन राम गायकवाड यांनी शाळा प्रशासनाला आधीच अधिकृतपणे पूर्वकल्पना दिली होती. हा कारभार बेकायदेशीर असून यामुळे पालकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, शाळा प्रशासनाने पालकांच्या या मागणीला पूर्णपणे केराची टोपली दाखवली. आपल्या मनमानी निर्णयामध्ये कोणताही बदल करण्यास किंवा वह्यांची सक्ती मागे घेण्यास शाळा प्रशासनाने स्पष्ट नकार दिला. शाळा प्रशासनाचा हा उद्धटपणा आणि पालकांच्या हक्कांना केराची टोपली दाखवण्याची वृत्ती यातून स्पष्ट होते.

Advertisement

शाळा प्रशासनाविरोधात ग्राहक न्यायालयात (Consumer Court) तक्रार दाखल!
शाळेच्या या व्यावसायिक आणि अनैतिक नफेखोरीविरोधात पत्रकार किसन राम गायकवाड यांनी ग्राहक न्यायालयात (Consumer Court) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. कोणत्याही ग्राहकाला (या प्रकरणात पालकांना) योग्य दरात आणि सक्तीशिवाय वस्तू निवडण्याचा अधिकार आहे. शाळा प्रशासनाकडून पालकांच्या ग्राहक हक्कांचे (Consumer Rights) सरळ सरळ उल्लंघन होत असल्यामुळे, न्यायालयात ही तक्रार दाखल करण्यात आली असून ‘एम.एल.आर.टी. गाला पायोनियर स्कूल’च्या मनमानी कारभाराला आता कायद्याच्या कचाट्यात खेचण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाचा कायदा काय सांगतो?
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या नियमांनुसार आणि शासन निर्णयानुसार (GR), राज्यातील कोणत्याही खाजगी, अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेला विद्यार्थ्यांना किंवा पालकांना शाळेतून अथवा शाळेने नेमून दिलेल्या ठराविक व्हेंडरकडून (दुकानदाराकडून) कोणत्याही प्रकारचे शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती करता येत नाही.

• यामध्ये वह्या, पुस्तके, गणवेश (Uniform), बूट किंवा इतर शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे.

• शाळांनी केवळ वह्या-पुस्तकांची यादी फलकावर किंवा नोटीसद्वारे प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. पालकांना हे साहित्य खुल्या बाजारातून किंवा त्यांना परवडेल तिथून घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. असे स्पष्ट कायदेशीर नियम असताना देखील ‘एम.एल.आर.टी. गाला पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूल’ खुलेआम स्वतःच्या कायद्याची अंमलबजावणी करत पालकांवर सक्ती लादत आहे. शासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवून सुरू असलेला हा मनमानी कारभार थांबवण्यासाठीच **’निर्भीड समाचार’**ने हा लढा सुरू केला आहे.

पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण
“शाळेची फी भरणे आधीच कठीण झाले आहे, त्यात आता वह्या-पुस्तकांच्या नावाखाली विशिष्ट व्हेंडरकडूनच साहित्य घेण्याची सक्ती अंगावर येणारी आहे. आम्ही विरोध केला तर आमच्या मुलांवर शाळा प्रशासन राग काढेल किंवा त्यांना वर्गात त्रास दिला जाईल, या भीतीने आम्ही उघडपणे बोलू शकत नाही,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका पीडित पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर ‘निर्भीड समाचार’कडे व्यक्त केली. पालकांच्या या हतबलतेचाच गैरफायदा शाळा प्रशासन घेत आहेत.

‘निर्भीड समाचार’चा इशारा: लढा थांबणार नाही!
एम.एल.आर.टी. गाला पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूल (कांदिवली पूर्व) आणि त्यांचा व्हेंडर सम्राट बुक इंडस्ट्रीज यांच्या या मनमानी कारभाराचा पर्दाफाश होईपर्यंत आणि पालकांना न्याय मिळेपर्यंत ‘निर्भीड समाचार’ हा लढा थांबवणार नाही. ग्राहक न्यायालय आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून शाळा प्रशासनाला चाप लागेपर्यंत कायदेशीर लढा सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x