प्रेमविवाहाची शोकांतिका: कोल्हापूर-रत्नागिरी दांपत्याचा संसार मोडणार


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

मुक्त पत्रकार: आशालता पिंपळे पाटील

सध्याच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगात प्रेमविवाहाचे प्रमाण वाढले असले, तरी एकमेकांना समजून घेण्यात येणाऱ्या अपयशामुळे अनेक सुखी संसार पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी आणि कौटुंबिक व्यवस्थेला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. गेल्या ११ वर्षांपूर्वी (२०१६ मध्ये) अत्यंत प्रेमाने आणि मोठ्या आशेने एकत्र आलेल्या कोल्हापूर आणि रत्नागिरी येथील दांपत्याचा संसार आता कोर्टाच्या पायऱ्या चढण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या दोघांच्या सुप्त संघर्षात त्यांच्या दोन निष्पाप आणि गोंडस मुलींचा मात्र सर्वच बाबतीत अतोनात छळ होत असून, त्यांच्या न्याय्य हक्कांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

भूतकाळ ते वर्तमान: ६ वर्षेही नीट एकत्र राहिले नाहीतमिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील तरुण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण (कौठर कलावंडे) येथील तरुणी यांनी २०१६ मध्ये प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर त्यांच्या संसारात दोन अत्यंत सुंदर आणि गोंडस मुलींचा जन्म झाला. मात्र, दुर्दैवाने या पती-पत्नीला गेल्या १०-११ वर्षांत एकत्र ६ वर्षेही सुखाने आणि गुण्यागोविंदाने संसार करता आला नाही. वैचारिक मतभेद, अंतर्गत कलह आणि कौटुंबिक वाद यांमुळे हा संसार केवळ नावापुरताच उरला होता. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, गेल्या दोन महिन्यांपासून ही तरुणी आपल्या दोन्ही चिमुरड्या मुलींना सोबत घेऊन सासर सोडून माहेरी निघून गेली आहे. सध्या ती स्वतः नोकरी करून आपल्या मुलींचा सांभाळ करत आहे.

दोन निष्पाप मुलींचा अप्रत्यक्ष मानसिक छळया संपूर्ण वादात सर्वात मोठी किंमत या दोन्ही निष्पाप मुलींना मोजावी लागत आहे. सध्याचे दिवस हे या मुलींचे शारीरिक, आत्मिक, शैक्षणिक, भावनिक आणि नैतिक विकासाचे आहेत. मुक्तपणे आयुष्य जगण्याच्या या वयात आई-वडिलांमधील वादामुळे त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे (Indirectly) प्रचंड मानसिक दडपण येत आहे. पालकांच्या या वादामुळे मुलींचे शैक्षणिक आणि व्यावहारिक नुकसान होत असून, त्यांचे बालपण कोमेजून चालले आहे. त्यांना हक्काचे प्रेम आणि सुरक्षित वातावरण मिळण्याऐवजी केवळ ताणतणावाचा सामना करावा लागत आहे.

Advertisement

५० लाखांची पोटगी आणि वांद्रे न्यायालयात लढा?आता ११ वर्षांच्या या विस्कळीत संसारानंतर मुलीच्या बाजूने अत्यंत कठोर पाऊल उचलण्याची तयारी सुरू आहे. पती आणि सासरच्या सर्व नात्यांपासून कायमचे विभक्त होऊन दोन्ही मुलींच्या कायदेशीर संरक्षणासाठी (Custody) आणि भविष्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवण्याचा विचार सुरू आहे. मुंबईतील नामांकित वांद्रे (Bandra) कौटुंबिक न्यायालयात हा खटला दाखल करून, दोन्ही मुलींच्या शिक्षण आणि उदरनिर्वाहासाठी सुमारे ५० लाख रुपयांची पोटगी (Alimony) मिळवता येईल का, या दृष्टीने कायदेशीर चाचपणी सुरू आहे. कायद्यानुसार, आईला नोकरी असली तरी वडिलांना आपल्या अल्पवयीन मुलींच्या संगोपनासाठी आर्थिक जबाबदारी नाकारता येत नाही. त्यामुळे या दोन गोंडस मुलींना न्यायालयातून नक्कीच न्याय मिळू शकतो.

सुवर्णमध्याचे आवाहन आणि भविष्यएक पत्रकार म्हणून समाजातील या विदारक वास्तवावर प्रकाश टाकताना, सर्व सुजाण वाचकांना आणि समाजमनाला या घटनेतून विचार करण्याचे आवाहन केले जात आहे. कोल्हापूरचा हा तरुण आणि रत्नागिरीची ही तरुणी या दोघांनीही आपल्या अहंकारा बाजूला ठेवून, केवळ आणि केवळ आपल्या दोन्ही मुलींच्या भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. जर कायदेशीर विभक्त होणे हाच अंतिम पर्याय असेल, तर त्यांनी कोर्टाच्या दीर्घ लढाईत मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त न करता सामंजस्याने सुवर्णमध्य काढावा, जेणेकरून मुलींचे भविष्य अंधकारमय होणार नाही.

या दुर्दैवी घटनेचा पुढील भाग आणि न्यायालयीन घडामोडी पुढील अंकात सविस्तरपणे दिल्या जातील.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x