वसुंधरेच्या संवर्धनास सरसावले माजी विदयार्थी
दि.१४ जुलै २०२४ रोजी थैमान घालत असलेल्या पावसाला न जुमानता अनुदत्त विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ” माझीशाळा, माजी विद्यार्थी ” ह्या ग्रुपमधील माजी विद्यार्थी व शिक्षकह्यांच्या तर्फे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला गेला.
कांदिवली पूर्व मुंबई विभागातील रामगड या भागात आरक्षित असलेली संजय गांधी उद्यानाची जागा या ठिकाणी वनविभाग अधिकारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासुन कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि विकासाच्या नावाखाली झालेली वृक्षतोड व त्यातून होत असलेली जमिनीची (दरड ) घसरणं व या नैसर्गिक आपत्तीने होत असलेली जीवित हानी व मालमतेचे नुकसान या सोबत उन्हाळ्यात वाढत असलेला तापमानाचा पारा व कमी कमी होत असलेला पाण्याचा साठा या सर्व बाबींना लक्षात घेऊन काही युवकांनी वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने पुढाकार घेऊन या नैसर्गिक आपत्ती ला भविष्यात आळा घालण्याच्या विचाराने एक पाऊल पुढे टाकून या उपक्रमाची सुरुवात म्हणून ५० रोपे लावून केली.





