“योजना कल्याणकारी शासन आपल्या दारी” व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा नेस्को, गोरेगाव येथे संपन्न..!!
मुंबई : “योजना कल्याणकारी शासन आपल्या दारी” व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा नेस्को, गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना पुरस्कृत आणि शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून नेस्को हॉल, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे ‘योजना कल्याणकारी, शासन आपल्या दारी’ दाखला वाटप कार्यक्रम आणि १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यासाठी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेबांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांच्या हस्ते नागरिकांना दाखला वाटप आणि विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबरीने शासकीय सेवा पुरविणाऱ्या कागदपत्रांची नोंदणी झाली. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये लकी ड्रॉ काढून तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या लकी विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि टॅब देण्यात आले व पहिल्या क्रमांकाची लकी विद्यार्थिनी उजाला गुप्ता हीला इलेक्ट्रिक स्कुटी देण्यात आली. माननीय श्री. एकनाथशिंदे साहेबांसह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत मांडून या अभिनव उपक्रमाबद्दल कौतुक करत, शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश दादा कदम, खासदार रवींद्र वायकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रामदासभाई कदम, शिवसेना नेते, माजी खासदार गजानन कीर्तिकर, माजी मंत्री आनंदराव अडसूळ, माजी खासदार संजय निरुपम, शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे, व्याख्यानकार विठ्ठल कांगणे, शिवसेना सचिव, अध्यक्ष शिव चित्रपट सेना सुशांत शेलार यांच्यासह अनेक मान्यवर, शिवसेनेचे इतर नेते, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. तसेच विद्यार्थी आणि हजारोंच्या संख्येने नागरिक देखील उपस्थित होते.





