पुणे पोर्शे कार प्रकरणी लाच दिल्याचे उघड
पुणे पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन तरुण तसेच त्याच्या कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये तीन ते चार गुन्हे घडले असल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. दरम्यान,
रक्ताचे सॅम्पल बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हळनोरला अशपाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांनी तीन लाख रुपये बाल हक्क न्याय मंडळाच्या आवारात दिले होते. पोलिस तपासात हे उघड झाल्यानंतर अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाडला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीतून लाचेच्या पैशातही अफरातफर झाल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, अशपाक मकानदारला ज्या व्यक्तीने पैसे घेतले होते त्याने तीन लाख नाही तर चार लाख रुपये दिले. अशपाकने त्यापैकी तीन लाख रुपये डॉक्टर श्रीहरी हळनोरला अतुल घटकांबळेच्या मार्फत दिले. चार लाख रुपयांमधील एक लाख रुपये स्वतःकडे ठेवले असल्याचं आता तपासातून समोर आलं आहे.
पोर्शे कार अपाघातामध्ये २ तरुणांचा मृत्यू झाला. या वेळी अल्पवयीन आरोपीचे रक्त तपासले होते. यावेळी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोरला यांनी आरोपीचे रक्ताचे नमुने बदल्याचं समोर आलं. तीन लाखांची लाच घेऊन सॅम्पल कचऱ्यात फेकल्याने ससून रुग्णालयातील दोघांना अटक करण्यात आली होती.





