‘देऊसारा सामाजिक संस्थेतर्फे’ वार्ड क्र. ३९ च्या माजी नगरसेविका सौ. विनयाताईंचा वाढदिवस जल्लोषात साजरा ..!!


मुंबई : दिंडोशी विधानसभेतील (शिवसेना शिंदे गट) वार्ड क्र. ३९ च्या माजी नगरसेविका सौ. विनयाताई विष्णु सावंत यांचा वाढदिवस क्रांती नगर, कांदिवली पूर्व येथील देऊसारा सामाजिक संस्थेतर्फे काल दिनांक ०७ सप्टेंबर २०२५ रोजी जल्लोषात साजरा करण्यात आला. देऊसारा सामाजिक संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. नितेश अंभोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Advertisement

या प्रसंगी शिवसेना गोरेगाव/दिंडोशी विधानसभा समन्वयक श्री. विष्णू सावंत साहेब, दिंडोशी विधानसभा उपविभाग प्रमुख श्री. नितीन स्वामी, गोरेगाव/दिंडोशी विधानसभा लोकसभा अध्यक्ष श्री. श्रीकांत यादव, युवा सेनेचे आत्माराम नाईक, शिवसेना महिला आघाडीच्या समन्वयक सौ. पुष्पा मिश्रा, निर्मला जैस्वाल, शिवसेनेचे पदाधिकारी राजू बाणे, सुजल उदमले, विभागातील जुने रहिवासी अमरनाथ शर्मा आणि बरेच शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. तसेच विभागातील महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता.

“निर्भीड समाचार” च्या वतीने सौ. विनयाताईंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x