रवींद्र धंगेकरांचे पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना खडेबोल सुनावले आहे. पब आणि क्लब तसेच बारमधून अधिकाऱ्यांना हफ्ते जात असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांची लाजच काढली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी हफ्ते घेतले असल्याचा आरोप केला होता. त्यावर अधिकाऱ्यांनी धंगेकरांचा आरोप खोटा असल्याचं वक्तव्य केलं आणि धंगेकरांचा आरोप फेटाळून लावला. रवींद्र धंगेकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापझाप झापलं आहे. यावेळी धंगेकरांचा पारा चढल्याचं दिसून आलं.
रवींद्र धंगेकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापलं आहे. हे सर्व खोटं असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला. त्यावर रवींद्र धंगेकर यांनी खडेबोल सुनावले आहे. ते म्हणाले की, मी आमदार नात्याने बोलत आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का? असं म्हणत धंगेकर यांनी सवाल केला आहे. तुम्हाला लाज कशी वाटत नाही?, मला म्हणता हे सर्व खोटं आहे, तुम्ही विधानसभेला उत्तर द्यायला उभे राहिलात का? असा सवाल करत धंगेकर यांनी कडक शब्दात सुनावलं आहे.
पुण्यातील नाईटलाईफला पाठिशी घालणाऱ्या सुपरीटेंडंट राजपूतला महिन्यात प्रत्येक हॉटेलमध्ये पैशाचे पाकीट पुरवले जाते, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. विमाननगर, कोरेगाव पार्क, बाणेर, हिंजवडी, भुगाव भुकुम, पिंपरी-चिंचवड, लोणावळा या ठिकाणी वसुली करणारे अनेक पोलीस अधिकारी आणि कॉन्स्टेबलही आहेत.
कॉन्स्टेबल सागर धुर्वे, तात्या शिंदे, समीर पडवळ, स्वप्नील दरेकर, गोरे मेजर, गोपाल कानडे तसेच खाजगी व्यक्ती युवराज पाटील, मुन्ना शेख, रवी पुजारी, तानाजी पाटील, माऊनी शिंदे, राजु इ. व काही लायसन्स धारक जसे राहुल रामनाथ, सुन्नी सिंह होरा, बाळासाहेब राऊत पण वसुली करतात. असा आरोप धंगेकर यांनी केला आहे.





