वार्ड क्रमांक २७ कांदिवली पूर्व मध्ये BMC चा अजब कारभार..!!


मुंबई : लोखंडवाला सर्कल कांदिवली पूर्व ते दामू नगर ला जाणाऱ्या रस्त्यावर वार्ड क्रमांक २७ (स्वा. विनायक दामोदर सावरकर चौक) या ठिकाणी असलेला गतिरोधक दोन्ही बाजूने तुटलेला आहे. यामुळे या ठिकाणावरून जाणारी वाहने गतिरोधक वरून न जाता सर्रासपणे खालच्या बाजूने वाहने घेऊन जातात. त्या ठिकाणाहून नागरिक ये-जा करतात अशा वेळी वाहनांचा वेग जास्त असतो आणि कधी कधी हे वाहनधारक हॉर्न न देता वाहन घेऊन जातात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजूलाच सावित्रीबाई फुले मैदान आहे. नुकतेच या रोडचे काम पूर्ण करण्यात आले. याच रोडच्या कॉर्नरला देखील खड्डे पडले आहेत. ते खड्डे बुजविण्याची आणि अर्धवट तुटलेले गतिरोधक बनविण्याची तसदी BMC ने घेतली नाही.

Advertisement

नवीनच बनविण्यात आलेल्या या रस्त्याची पाहणी वार्ड क्रमांक २७ च्या माजी नगरसेविका सौ. सुरेखा पाटील यांनी केली आणि काम व्यवस्थितरित्या झाल्याच्या आशयाची पोस्ट त्यांनी फेसबुक वर पोस्ट केली. पण त्यांनी देखील त्यासंबंधी प्रशासनाला विचारण्याची तसदी घेतली नाही. म्हणजे राहिलेल्या कामासाठी परत टेंडर पास करून निधी काढायचा आणि मलिदा खायचा असे तरी यावरून दिसून येते.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x