क्रांती नगर मध्ये अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांवर अं.प.वि. पथकाची कडक कारवाई..!!


मुंबई : क्रांती नगर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व हे ठिकाण शासनाने स्लम म्हणून घोषित केले आहे. आजूबाजूला दामू नगर, रामगड आणि भिम नगर हा सर्व प्रांतीय असलेला दाट लोकवस्तीचा भाग आहे. या भागात मोठया प्रमाणात अंमली पदार्थांचा व्यापार चालतो. यामध्ये ड्रग्स, चरस, गांजा आणि कोकेन यासारख्या अंमली पदार्थांची विक्री केली जाते. आजची तरुण पिढी ही यासारख्या पदार्थांच्या खूपच आहारी गेली आहे. परिसरात असलेल्या अनाधिकृत पार्किंग मध्ये युवा वर्ग सर्रासपणे याचे सेवन करताना आढळून येतात.

यासंदर्भात निर्भीड समाचार च्या वतीने अंमली पदार्थ विरोधी कक्षाला तक्रार करण्यात आली होती त्यानुसार त्यांनी १२ गुन्हांची नोंद केली असून १२ आरोपींना अटक केली आहे. एकूण २६ जणांना अटक आणि कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ३ किलो ११४ ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे रुपये ९५,६६०/-), ०.००६ ग्रॅम कोकेन (किंमत अंदाजे रुपये ६,००,०००/-) आणि ०.००४ ग्रॅम मेफेड्रोन MD (किंमत अंदाजे रुपये ४०,०००/-) एवढा माल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

 

स्लम भागातच नव्हे तर अनेक मोठ- मोठ्या पॉश भागातही हा व्यापार चालतो हे जगजाहीर आहे. या विरोधात अंमली पदार्थ विरोधी पथके कारवाई देखील करतात. पण आजघडीला अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. आजची युवा पिढी मग तो तरुण असो की तरुणी या व्यसनाच्या इतके आहारी गेले आहेत की भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. या अंमली पदार्थांच्या व्यापाराला राजकीय पाठिंबा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण यामुळे देशाचे भवितव्य धोक्यात येत आहे.

याविरोधात अजून कडक कारवाई करण्यात यावी यासंबंधी निर्भीड समाचार प्रयत्नशील राहील.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x