अंधेरी स्थानक पूर्व (आगरकर चौक) ते सीप्झ ला जाणाऱ्या चाकरमान्यांचे “BEST” हाल..!!


मुंबई : अंधेरी स्थानक पूर्व (आगरकर चौक) ते सीप्झ ला जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. लोकसंख्येच्या तुलनेने बेस्ट बसेस ची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे बसेस मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दीमुळे पुढच्या स्टॉप वरील लोकांना बस मध्ये चढायला जागाच मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. अंधेरी स्थानक पूर्व (आगरकर चौक) ते सीप्झ दरम्यान ४१५, ५४५, ४९६,४३४ आणि ४०३ या नंबरच्या बसेस या मार्गावर धावतात. पण तरी देखील लोकांना बराच वेळ रांगेत तात्काळत उभे राहावे लागते. याचा परिणाम म्हणून लोकांना कामावर जाण्यास उशीर होतो. कारण बस मध्ये चढायला जागाच मिळत नसल्यामुळे देखील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे.

या सर्व बसेस अंधेरी स्टेशन वरूनच भरून येत असल्यामुळे पुढे असणाऱ्या स्टॉप वर उभ्या असणाऱ्या लोकांना बस मध्ये चढ़ायला मिळत नाही. चुकून बस खाली जरी असली तरी ड्रायव्हर लोक मुद्दाम बस थांबवत नाहीत. बस मध्ये जेमतेम चार पाच माणसे चढतील एव्हढी जागा असली तरी ड्रायव्हर बस थांबवत नाहीत. म्हणजे मध्ये असणाऱ्या स्टॉपवर थांबणाऱ्या लोकांनी जायचे कसे? ही खूप मोठी समस्या आहे. सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळेस प्रवाशांचे अतोनात हाल होतात.

Advertisement

याबाबत ‘निर्भीड समाचार‘ च्या वतीने बेस्ट प्रशासनाला तक्रार दाखल करण्यात आली. यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ‘निर्भीड समाचार’ च्या सूचनेची दखल घेत ते म्हणाले सद्यस्थितीत बेस्ट उपक्रमाकडे नवीन बसगाड्यांचा ताफा मर्यादित स्वरूपात आहे. भविष्यात बेस्ट उपक्रमाकडे नवीन बसगाड्यांचा ताफा उपलब्ध झाल्यानंतर आगरकर चौक ते सीप्झ या दरम्यान चालणाऱ्या बसमार्गाच्या बसफेऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत आवश्यकतेनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

तरी देखील आपण या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे जेणेकरून लोकांचा त्रास कमी होण्यास मदत होईल.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x