“आम्ही संविधान प्रेमी” संघटनेच्या वतीने परभणी येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध
मुंबई : विजय उत्तमबाई मनोहर कांबळे
“आम्ही संविधान प्रेमी” या संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, क्रांती नगर ते कुरार पोलिस ठाणे पर्यंत परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केलेल्या आरोपीला जरी अटक करून केस दाखल झाली असली तरी त्याला आणि सहआरोपिंना सुद्धा लवकरात लवकर शोधून त्यांना देशद्रोहाची शिक्षा ठोठावण्यात यावी.
तसेच या मागे असलेल्या मास्टर माईंडला लवकरात लवकर शोधून तात्काळ अटक करण्यात यावी.
संविधान प्रेमीवर केलेल्या कोम्बिंग ऑपरेशना विरुद्ध चौकशी करून कारवाई करावी आणि अशी घटना परत होणार नाही याची सर्व संविधान रक्षकांनी व प्रशासनाने काळजी घ्यावी अन्यथा पूर्ण महाराष्ट्र व देशात मोठे आंदोलन करू यांची नोंद घ्यावी.
सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे तर या अधिवेशनात असं परत होवू नये कारण सरकारच संविधानावर चालत आहे याची आठवण ठेवून झालेल्या घटनेचा सर्व पक्षीय आमदार, खासदार, प्रधानमंत्री यांनी या पुढे देशात अराजकता माजणार नाही.
देशात भाईचारा अबाधित राहील याची शपथ घ्यावी अशी आम्ही संविधान प्रेमी च्या वतीने प्रशासनाला जागे करण्यासाठी तसेच जे परभणीत झालं ते अन्यत्र महाराष्ट्रात किंवा देशात होवू नये याची जबाबदारी सत्तेत असणाऱ्यांनी घ्यावे अन्यथा जेव्हा केव्हा समाजात असंतोष वाढतो तेव्हा सत्ता उलथवून टाकायला जनताच रस्त्यावर येते हे सत्ताधाऱ्यांनी विसरू नये असं मत मांडत कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना आम्ही संविधान प्रेमी या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन हे संविधान प्रेमी तरुणांनी एकत्र येत केलं ज्यात आप्पा पाड्यातील अविनाश शिंदे, योगेश बोले, सुनिल जयस्वाल तर क्रांती नगर मधील ऍड. दिपक जगदेव, विजय कांबळे यांनी पुढाकार घेऊन निषेध रॅली काढली.
ज्याला समाजातील संविधान प्रेमी महिला, पुरुष आणि तरुणांनी प्रतिसाद दिला तर असेच समाजाने सतत जागरूक राहील पाहीजे आणि चुकीच्या घटनेचा नेहमीच निषेध केला पाहीजे हे स्पष्ट करण्यात आले.
मग आपल्या सोबत संख्या किती आहे हे न बघता जे जागरूक आहेत त्यानी एकत्र आलच पाहीजे आणि बाबासाहेबांनी दिलेला गुरुमंत्र म्हणजे शिका, संघटित व्हा, आणि अन्यायाविरुद्ध बंड करा हेच समाजात रुजवल पाहीजे तरच समाज स्वाभिमानाने जगेल अन्यथा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही.





