कांदिवलीतील ठाकुर काम्प्लेक्स मधील “स्वराज नंदिवाले” आणि हनुमान नगर येथील “राणी हिरके” यांची मुंबई पोलीस सेवेत नियुक्ती…!!!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स येथील “स्वराज अंबाजी नंदिवाले” आणि हनुमान नगर येथील राणी दऱ्याप्पा हिरके हे “श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालय” येथे पोलीस भरतीचा अभ्यास करायला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी जवळपास दोन वर्ष अथक प्रयत्न करून मुंबई पोलिस सेवेत शिपाई म्हणून रुजू होणार आहेत. याचा आनंद या वाचनालयातील त्यांचे सर्व मित्र एकत्र येत दोघांनाही त्यांच्या पोलीस भरतीतील यशासाठी जल्लोष करत शुभेच्छा दिल्या. याविषयी आपण “स्वराज आणि राणी” यांच्याशी जाणून घेऊया की कस वाटतंय आज त्यांच्या मेहनतीने मिळवलेल्या यशा बद्दल…!!
स्वराज यांनी सांगितलं की तो खूप आनंदी आहे. कारण गेल्या भरतीत दोन गुणांनी प्रतीक्षेत ठेवला गेलो होतो पण भरती होवू शकलो नाही. पण या वर्षी अधिक गुणांनी मी परीक्षेत पास होऊन हे यश मिळवले आहे. हे सांगतच आपले पदवी पर्यंत शिक्षण स्वराजने सोलापूर येथील “शाहू कॉलेज” येथून पूर्ण केले. पण पदवी नंतर पुढे न शिकता काहीतरी व्यवसाय करायचं ठरवलं आणि कुक्कुट पालन व्यवसाय सुरु केला पण कोरोना आल्यामुळे जशी अनेकांची अवस्था झाली तशीच स्वराजलाही व्यवसायात नुकसान झाले, ज्यामुळे त्या व्यवसायातून जास्त काही हाती आलं नाही.
वडिलांनी अनेकवेळा गावातील राजकारणात सक्रिय होण्याची स्वराज जवळ इच्छा व्यक्त केली होती. सरपंच हो गावातच आपलं काम कर गावाचा विकास कर आणि पुढे मोठा राजकारणी होशील असं वडिलांनी सांगून सुद्धा स्वराज मात्र आपल्या स्वप्नांच्या वाटेवर चालायला ठाम होता.
अखेर आपला व्यवसाय करण्याचं मनातून काढून टाकलं आणि मग गावात काही होणार नाही आपण पोलीस भरतीतच जावं हे मनोमन त्याला वाटायचं. सुरुवात आपण पोलीस उप निरीक्षक पासून करावी आणि पुढे काम करत करत आणखीन वरिष्ठ पदं भूषवावीत ही मनोकामना उराशी बाळागून 2023 ला मुंबईला आला.
कांदिवलीतील “स्वराज्य अकॅडमी” जी पोलीस भरतीची शिकवण देते त्यात प्रवेश घेतला आणि पोलीस भरतीचा अभ्यास सुरु केला. कारण पदवी शिक्षण घेत असताना स्वराज हा दिल्ली येथे आजचे “कर्तव्य पथ” जुने “राजपथ” येथे 2015 च्या 26 जानेवारी रोजी परेडला गेला होता. सोलापूर जिल्यातुन माझी एकट्याची निवड या परेड साठी झाली होती. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा आले होते, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी होते.
लहान भाऊ इसरो (ISRO) मध्ये सिनीयर इंजिनिअर आहे आणि मोठा भाऊ फार्मा कंपनी मध्ये HR म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे स्वराजला भावंडानकडून आर्थिक मदत ही मिळत होती म्हणून स्वराज संपूर्ण एकाग्रतेने आपली तयारी करू शकला म्हणून माझ्या या यशात माझ्या भावंडांचीही मोठी मदत झाली आहे असं स्वराजने बोलताना सांगितलं.
राणीला सुद्धा भरपूर आनंद झाला आहे मात्र सोबतच थोडं दुःखही आहे. लहानपणापासून पोलीस होण्याची इच्छा होती. कारण महिला पोलिसांचे गणवेश आवडायचे त्या गणवेशात त्या रुबाबदार दिसायच्या. असं वाटायचं की आपणही पोलीस झालं पाहिजे. आठवी पासून छोटी मोठी कामं करत आपल शिक्षण पूर्ण केलं.
वडील हे उप जिल्हाधिकारी यांचे ड्राइवर होते आणि त्यांना मी पोलीस व्हावं हे आवडत नव्हतं.
2021 ला पदवीचं शिक्षण पूर्ण झालं आणि 2022 ला पोलीस भरतीसाठी सराव करायला सुरु केली. हे करत असताना सुद्धा मी प्रायव्हेट जॉब सुद्धा करत होते. कामावरून येऊन मी पळायला जायचे हे वडिलांनपासून लपूनच करत होते पण सराव करताना वडिलांचे मित्र भेटले आणि त्यांना कळलं की मी पोलीस भरतीसाठी मेहनत करतेय तेव्हा त्यांच्याकडून माझ्या वडिलांना कळलं आणि त्यांनीही मला मेहनत करताना बघितल्यावर मात्र मला म्हणाले की तू पोलीसच हो.
ग्राउंडच्या परीक्षेवेळी वडील गेले त्यानंतर मी खूप खचली होती आणि भरती सोडून देण्याचा विचार देखील केला. पण स्वराज आणि वाचनालयातील सर्व मित्र मला खचून जाऊ नकोस म्हणून समाजावत होते मला मार्गदर्शन करत होते म्हणून मी त्यातून सावरू शकले.
मित्रांनीच मला माझी आणि वडिलांची जी इच्छा आहे तेच करायला सांगितलं आणि मित्रानी आर्थिक मदत करू जर तुला लागली तर असं सुद्धा आश्वासन दिलं होतं पण माझी मोठी बहीण मला आर्थिक मदत करायची त्यामुळे मित्रांची मदत कधी घेण्याची वेळ आलीच नाही.
फक्त आज मी पोलीस झाले. 2025 मार्च पासून पोलीस शिपाई म्हणून आम्ही रुजू होणार आहोत. पण हे बघायला आज माझे वडील हयात नाहीत याची खंत वाटते. पण बाबांनाही वाटलं होतं की मी पोलिसच व्हावं म्हणून मला वाटत त्यांच्या आशीर्वादामुळे मला हे यश मिळालं असावं असं राणीला वाटत आहे.
दोघांनाही त्यांच्या या यशस्वी वाटचालीसाठी “निर्भीड समाचार” च्या वतीने सुद्धा मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!!






chan patrkarita.