थोरले भाऊ : भगवान रामा कटारे यांना चौथ्या स्मृती दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन…


थोरले भाऊ : भगवान रामा कटारे यांना चौथ्या स्मृती दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन…

“दुसरी शिकलेले नाना, बारा देश फिरून आले मातृभूमित ”
दिनांक १८ सप्टेंबर २०२४ बुधवार
सोनाटी ता. मेहकर जि. बुलढाणा ४४३३०१

दिनांक: ४ फेब्रुवारी १९६२ साली पिंपरी माळी ता. मेहकर जि. बुलढाणा रूस्तुम शंकर वानखडे मामाच्या गावी दादाचा जन्म झाला . आमच्या आजोबा कडे शेतजमीन काहीच नव्हती पण आईवडीलांनी व काकांनी निढळच्या घामाने आठ एकर शेत घेतली .पण फार दूर होती. ती विकली दुसरी घेतली पण जास्त पुरामुळे नापिक होत असे .

आम्ही तिघं भावंडे व एक बहिण .नाना माझ्या पेक्षा मोठे .आम्ही सर्वजण दादाला” नाना “म्हणत असू .एक टोपणनाव समजा . दि :- १६ /८ / १९७३ सोनाटीच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली मध्ये नाव दाखल केले . परंतू शाळेमध्ये जास्त आवड नसल्याने म्हणा किंवा शाळेचे महत्त्व न कळले म्हणा सतत गैरहजर म्हणून दि : २८ फेब्रुवारी १९७५ ला शाळेकडे पाठ फिरवली . शाळेत जाणे बंद केले .मित्रांसोबत पैनगंगा नदीवर ,खडक्या डोहावर पोहायला . झाडावर लपंडाव खेळायला माळरान -शेत यातील कामे करण्यात धन्यता वाटली . मला मात्र रोज सांगायचे माझाही अभ्यास कर . मी लहान खुप अभ्यास करायचो माझापण व भावाचा पण रात्रंदिवस. मला वाटले माझा भाऊ पास होईल मी दोघांचा अभ्यास केल्यानंतर. मी सदैव उत्तीर्ण झालो .दादाची शाळा कायमची सुटली.

येथूनच आयुष्याला कलाटणी मिळाली . आमच्या सोनाटी गावात गणपतराव आयाजी हुले / तात्या यांच्या घरी फक्त दोन वेळच्या जेवणावर महिण्याने वडीलांनी नानाला ठेवले . फक्त एक कोकणी म्हैस व वाकड्या शिगांची हरणी गाय सांभाळायची रोज . हळूहळू सर्व हुले परिवार त्यांचे सर्व नातलग, प्रल्हाद दादा हुले यांच्या सोबत जाऊन सर्व माहिती झाले. वयाच्या अकरा वर्षापासून सन १९७३ ते १९८७ पर्यंत .१४ वर्षे प्रल्हाद दादा सोबत शेतात ,नागरणी, वखरणी, पेरणी, मळणी मांडवावर उन्हाळ्यात राहणे . राखन करणे, धन धान्यांचे, शेताचे. हीच कामे गाडी, बैल, कडबा ,काळी माती ,शेत ,जागरण यांच्या शी नाळ जोडली. अहोरात्र शेतात काम केले. महिने – साल रात्रंदिन फक्त शेत आणि शेत रामदास भाऊ हुले, प्रल्हाद दादा हुले, माजी सरपंच सोनाटी पंडित गणपत हुले यांचे सर्व शेत नानाच्या घामाने भिजून निघाले .
तिच ओळख गावचा संबंध या नात्याने माझ्या बी .एड् शिक्षणासाठी रामदास भाऊ हुले व गणपत तात्या यांच्या पैशावर माझे बी एड् शिक्षण झाले . मला मुंबईत शिक्षकाची नोकरी मिळाली . उसने घेतलेले सर्व पैन पै पैसे परत केले ईमानदारीने. आमचे नानांनी महादा मामा सोनटक्के व माजी सैनिक नारायण वानखेडे काका यांच्या घरी महिने -साल घातले शेतातील सर्व मेहनतीची कामे केली. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूत शेतातील काम -काम जसे नानाच्या पाचवीलाच पुजलेले.
सन १९८७ लग्नानंतर तान्ही लेक सहा महिन्याची घेऊन स्वप्नाचे शहर मुंबई गाठली. मुंबई गावच्या मंडळी सोबत राहून धारावी ,सायन, वडाळा, विलेपार्ले, मीरारोड, भायंदर, नालासोपारा या मुंबई उपनगरात राहून इमारत बांधणी खात्यात विटा, सिमेंट, रेती गोण्या उचलून तद्वतच बांधकाम शिकले, कडिया काम करता ठेकेदार झाले . विशेष म्हणजे मला नानांनी मुंबईत ओळखीने पहिली नोकरी लावली. मेडीकलवर औषधी -गोळ्या देण्याची 500 ₹ पगार.

Advertisement

धन्यवाद नाना. आज हवे होते तुम्ही. रवी (टेक्स्टाईल इंजिनिअर) व दुर्गादास (केमीकल इंजीनियर) चांगल्या नामांकित कंपनीत आहेत.

सोनाटीत असताना तुम्ही व तुमचे विलास कटारे सारखे सर्व जीवलग मित्र मिळून शेजारच्या खेड्यापाड्यात जाऊन धान्य ,पैसे गोळा करून व काही आमदार निधीतून एक छान, शानदार बुद्ध विहार बांधले सर्व मंडळी त्यात तुमचा सिंहाचा वाटा होता.
खरा जगण्याला अर्थ निर्माण झाला येथून पुढे तिसरीत सतत गैरहजर विद्यार्थी म्हणून नोंद असलेला व्यक्ती आपल्या भाच्याच्या साहाय्याने ( आयु.आत्माराम उर्फ छगन सावळे पांग्रीकुटे , मालेगाव ) यांच्या मदतीने पासपोर्ट काढला. थेट आफ्रिका खंड गाठला . नायजेरिया प्रगत देश. तिथे दोन वर्षात सिमेंट बनविण्याचा कारखाना उभा केला दक्षिण भारतातील श्री राव उद्योजक यांच्या कंपनीत. सन 2003 ते 2005 2005 ला पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ पहायला मिळाले नाना तुमच्या मुळे.

नंतर तुम्ही कंपनीच्या कामात सदैव व्यस्त राहिले. दोन, तीन महिने गावी येऊन 7- 8 आखाती देश फिरून आले. दोहा- कतार, मस्कत, उमान, अरब- ऐ -अमिरात, सौदी -अरेबिया, दुबईतील बूर्ज खलिफा पाहिला. असे देश पाहून आले . फाडफाड इंग्रजी बोलायचे . आम्ही चक्क आवाक होऊन पाहत बसत होतो . आपली मयु माझी मुलगी, पत्नी, मित्र,भाऊ मुद्दाम हून तुम्ही परदेशातून आले की एअरपोर्टवर भेटायला येत होतो. तुमचीच प्रेरणा घेऊन विमानाने तीन वेळा माझा प्रवास घडला . १ ) चेन्नई ते मुंबई
२) मुंबई ते मदुराई
३) बैंगलोर ते मुंबई .
तुमची जिद्द , मेहनत, इमानदारी, कष्ट याला अनन्यसाधारण महत्त्व आले.

विदेशातील वर्णन छान सांगायचे. आल्यावर विदेशी नोटा द्यायचे एखादी बघायला आम्हाला. आफ्रिकेच्या तुमच्या मित्राशी मी सदैव बोलत होतो. तुमच्या मुळे घरात मुंबईत MTNL landline फोन घेतला संगणक, Skype camera तून परदेशी बोलणे व्हायचे.

आज तुमची दोन मुले रवी व दुर्गादास आपले इंजिनिअर आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा तर माझा खारीचा वाटा. तुमच्या नाना कडून शिकण्यासारखे खुप आहे . मी सदैव उदाहरणे, दाखले देतो भाऊ असावा तर नानासारखा…नेहमी सकारात्मक वृती. सोनाटी गावात सर्व घरामध्ये १० घरात गिणती होईल असे घर बांधले . तुमचे गान आजही आठवते कानाभोवती गुणगुणते.

झोपडीच्या जागी दिसू लागला बंगला …

मेरा भाई काम ही काम करता था | एक देहात से लेकर, इंटरनैशनल बन खये | बारा देश घुम के आये|
बडा था पहेलवान, ना था किसी बात का घमंड, खुद ही
हंसता था, और दुसरोंको भी हंसाता था |
बडे प्यार से हमको संभालता था | ना हमको कभी मारा चाटा, ना कभी डाटा- पिटा, सबको प्यार ही प्यार करता था | हमेशा काम ही काम करता था | मेरा भाई…

नाना विनम्र अभिवादन …
वहिनी, ताई, बाई, भाऊ मुलं, सुना, सगे सोयरे, नातलग, सर्वजण रवी कांबळे सातारा मित्र सारखे खुप आठवण काढतो आम्ही हेच आमच्या कडे शिल्लक आहे…आठवण तुमची…

तुमचा भाऊ …
सुदाम रामभाऊ कटारे शिक्षक
मुंबई
8928517457


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x