शरद पवारांना धक्का
राज्यात लोकसभा निवडणूक पार पडून आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे दिल्ली येथे सक्रिय असलेले नेते धीरज शर्मा हे एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. धीरज शर्मा यांनी एक फेसबुक पोस्ट केली त्यात त्यांनी शरद पवार यांना सोडण्याबाबत नमूद केलं आहे. त्यामुळे ते आता शरद पवार यांना सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं आहे. धीरज शर्मा यांनी जरी पक्षाचा राजीनामा दिला असला तरीही प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती सूत्रांद्वारे समोर आली.
मी धीरज शर्मा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिलेल्या सर्व पदांमधून स्वत:ला मुक्त करतो आहे, असं फेसबुक पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ही पोस्ट लिहित असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या फेसबुकला आणि शरद पवार यांना त्यांनी मेन्शन केलं आहे.
धीरज शर्मा हे राष्ट्रवादीचे युवा चेहरा आहेत. धीरज शर्मा दिल्लीत राहतात. दिल्लीतील तरूण वर्गाशी त्यांचा सुसंगत संवाद आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. दरम्यान अद्यापही धीरज शर्मा हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडले नाहीत. ते अजूनही शरद पवार यांच्यासोबतच आहेत. फक्त त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाचा राजीनामा दिला. यामुळे ते आता पक्ष सोडणार असल्याच्या तर्क वितर्कांना आता उधाण आलं आहे.
मात्र येणाऱ्या काही वेळेत याबाबत जर धीरज शर्मा यांनी जर मोठा निर्णय घेतला तर कदाचित ते पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कदाचित असं घडल्यास पक्षाचा युवा चेहरा नेमका कोण असेल? यावर आता प्रश्नचिन्ह आहे.





