वंचित चा सुप्रिया सुळेंना पाठिंबा प्रकाश शेंडगे नाराज
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील यांना लोकसभेमधे दिलेल्या पाठिम्बयामुळे ओबीसी बहुजन पार्टीचे लोकसभा उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Advertisement
प्रकाश शेंडगे यांच्या नुसार वंचितने घेतलेला हा निर्णय राज्यातील ओबीसी जनतेच्या दृष्टीने धक्कादायक आहे. त्यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच ओबीसी नेते लक्ष्मण गायकवाड आणि मछिंद्र भोसले यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.




