नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय


 

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. तब्बल ११  वर्षांनी या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे.

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध झाले असून या प्रकरणात हे दोघे दोषी असल्याचे आढळून आले आहे. या दोघांनाही न्यायालयाने सश्रम जन्मठेपेसह पाच लाखांचे दंड भरण्याची शिक्षा देखील सुनावली आहे. तसेच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

Advertisement

विरेंद्र तावडे यांच्यावर कटकारस्थान रचल्याचा आरोप होता. संजीव पुनाळेकर यांनी शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला आरोपींना दिला होता. याविषयी फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आम्ही आदर करतो, पण उर्वरीत आरोपींना निर्दोष सुनावण्यात आल्याने आम्ही या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊ, असं दाभोलकरांच्या वकिलांनी सांगितलं.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ च्या सकाळी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला होता. त्यासंदर्भातील निकाल आज न्यायालयाने दिला आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x