नांदेड मधे आयकर विभागाचा छापा


महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. भंडारी फायनान्स आणि आदिनाथ सहकारी बँकेवर छापा टाकून आयकर पथकाने ही कारवाई केली आहे. तब्बल ७२ तासांच्या कारवाईनंतर आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त केली आहे.

या छाप्यात विभागाला भंडारी कुटुंबाची तब्बल १७० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. छापेमारीत १४ कोटींची रोख रक्कम ८ किलो सोने सापडले आहे. ही रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल १४ तास लागले. या कारवाईमुळे फायनान्स व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भंडारी यांचा नांदेडमध्ये खासगी फायनान्सचा मोठा व्यवसाय आहे. आयकर विभागाला या ठिकाणची कर चुकवल्यासंदर्भातची तक्रार आली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, नाशिक, परभणी आणि नांदेड या सहा जिल्ह्यांच्या आयकर विभागाच्या शेकडो अधिकाऱ्यांनी संयुक्त छापेमारी केली.

Advertisement

आयकर विभागाचे १०० अधिकाऱ्यांचे पथक २५ वाहनांतून नांदेडला पोहोचले होते. या पथकाने अलीभाई टॉवर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​कार्यालय, कोठारी कॉम्प्लेक्समधील कार्यालय, कोकाटे कॉम्प्लेक्समधील तीन कार्यालये आणि आदिनाथ अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेवर छापे टाकले. याशिवाय पारसनगर, महावीर सोसायटी, फरांदे नगर, काबरा नगर येथील घरांवरही छापे टाकण्यात आले.

नांदेड जिल्ह्यात प्रथमच आयकर विभागाने अशी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस कारवाई सुरू ठेवली. यावेळी सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. ७२ तास चाललेल्या या कारवाईत आयकर विभागाने तब्बल १७० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. सध्या आयकर पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x