निसर्गाचा वैश्विक नियम; ज्येष्ठ नागरिकांनी अपेक्षा कमी करणे काळाची गरज!


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

बदलत्या युगासोबत मानवी जीवनशैली, विचार आणि गरजांमध्ये वेगाने बदल होत आहेत. आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात मानवाने स्वतःच्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. विशेषतः “ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या अपेक्षा आणि हौस ही लहान महिन्यांच्या बाळासारखी कमी करणे ही या काळाची व युगाची सर्वात मोठी आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन एका अभ्यासकाने केले आहे. इतिहास आणि अध्यात्माचा दाखला देत, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मानवाने आपल्यातील अवगुण सोडून परिवर्तनाचा स्वीकार करणे कसे गरजेचे आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.

निसर्गाचा समतोल आणि मानवी अवगुण: इतिहास आणि संत वाङ्मय आपल्याला नेहमीच हे शिकवत आले आहे की, जगामध्ये केवळ ‘प्रेम’ हीच अशी गोष्ट आहे ज्याच्या जोरावर संपूर्ण विश्व जिंकता येते. पूर्वीच्या काळी २५० वर्षे उत्तम आणि निरोगी आयुष्य जगणारी पिढी आपल्याकडे अस्तित्वात होती. मात्र, आजचा आधुनिक मनुष्य स्वतःच्या कलागुणांचा योग्य वापर करण्याऐवजी स्वतःमध्ये विविध अवगुण बाळगून जगत आहे.

या मानवी स्वार्थ आणि अवगुणांमुळे आज सुंदर निसर्ग + पर्यावरण + मानवी आरोग्य यांचे त्रिसूत्रीय समीकरण बिघडले आहे. सृष्टीचे निर्माते, पालनकर्ते आणि संहारक मानल्या गेलेल्या ‘ब्रह्मा, विष्णू, महेश’ यांच्या निसर्गातील समतोलाला मानवाने आपल्या कृतीतून धक्का पोहोचवला आहे. येत्या ५००० वर्षांत जे निसर्गाचे परिवर्तन किंवा चक्र होणार आहे, ते आपण मनुष्य म्हणून बदलू शकत नाही, हीच त्रिकालाबाधित सत्य परिस्थिती आहे आणि ती मानवाने आता मान्य केलीच पाहिजे.

कालचक्राचे दोन पैलू: एक उद्बोधक उदाहरण: आयुष्याचे गणित आणि काळाचा महिमा समजून सांगण्यासाठी १३ डिसेंबर २००१ या एकाच तारखेचा संदर्भ घेऊन दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या जीवनप्रवासाचे अत्यंत मार्मिक उदाहरण समोर ठेवण्यात आले आहे:

Advertisement

१. पहिली व्यक्ती (कर्तव्य आणि भावनाप्रधान): या व्यक्तीने आपल्या आयुष्यात परमेश्वरावर अथांग प्रेम केले. कुटुंबाला प्रेम, माया, जिव्हाळा दिला आणि आपली सर्व कर्तव्ये उत्तम रीतीने पार पाडली. मात्र, वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी या व्यक्तीने आपल्या मायेच्या माणसांना अर्धवट सोडून देवाघरचा रस्ता धरला. म्हणजेच, भरपूर प्रेम आणि कर्तव्य करूनही आयुष्य क्षणभंगूर ठरले.

२. दुसरी व्यक्ती (ध्येयवादी तरुण पिढी): याच्या अगदी विरुद्ध, दुसरी व्यक्ती जिचे वय सध्या २४ वर्षे आहे, तिने इतक्या लहान वयात अत्यंत उच्च शिक्षण घेऊन समाजात स्वतःला सिद्ध केले आहे. हा तरुणही तितकाच मोठा देवभक्त आहे आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी धडपडत आहे.या उदाहरणावरून हेच स्पष्ट होते की, वय, शिक्षण किंवा कर्तव्याचा आणि मृत्यूचा कोणताही थेट नियम आपण ठरवू शकत नाही. प्रत्येकाचा प्रवास हा पूर्वलिखित आणि निसर्गाच्या अधीन आहे.

पंचतत्व आणि मोक्षाचा वैश्विक नियमआपले शरीर आणि हे संपूर्ण जग अग्नी, जल, वायू, भूमी आणि आकाश या पंचतत्वांनी बनलेले आहे. या सृष्टीतील कोणताही जीव जेव्हा उत्तम कर्म आणि सत्कार्य करतो, तेव्हाच तो उत्तम आरोग्यसंपन्न आणि सुंदर आयुष्य जगू शकतो. शेवटी सर्वांना मोक्ष मिळवून अंतर्धान पावायचे आहे.

मानवाने कितीही भौतिक गोष्टींचा आटापिटा केला, संपत्ती गोळा केली किंवा निसर्गाच्या नियमांविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याचा काही उपयोग होणार नाही. जसा या अथांग विश्वाचा आणि ब्रह्मांडाचा नियम आहे, तसेच आपण सर्व या पृथ्वीवर येणार, आपले कार्य करून जाणार आणि मोक्षाच्या प्रवासासाठी अनुत्तरितच राहणार आहोत. त्यामुळे अपेक्षा कमी ठेवून, निसर्गाशी एकरूप होऊन जगणे हाच सुखी आयुष्याचा एकमेव मार्ग आहे, हाच या विचारांचा मुख्य उद्देश आहे.

मुक्त पत्रकार/ लेखक/नागरी संरक्षण दल स्वयंसेवक: आशालता योगेश पिंपळे पाटील.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x