मायावतींचा काळ संपला? चंद्रशेखर आझाद यांच्या संघर्षावर विशेष लेख
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
आदरणीय मायावती यांचं कार्यकाळ संपला आहे असं यावरून तरी मला व्यक्तिशः वाटत आहे. कारण जे मत त्यांना अस्खलित पणे स्वतःच्या शब्दात आता मांडता येत नाही असं दिसत आहे. कारण त्या कोणीतरी त्यांना लिहून दिलेलं फक्त वाचत आहेत.
कारण यांना मुख्यमंत्रीचे तीन वेळा जे पद मिळाले ते असं फक्त मतदान करून खरच मिळालंय की हे मिळवण्यासाठी मा. कांशीराम यांनी अनेक वर्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करून मिळवलंय हे त्या स्वतःच विसरत आहेत.
तर भाई चंद्रशेखर आझाद हा एकमेव तरुण लढतोय, गोळ्या खातोय, सत्तेत जातोय आणि तिथे जाऊन सुद्धा तो आपले मूळ विसरला नाही याचा मला आदर वाटतोय अन्यथा सत्तेत गेलेले अनेक नेते मूग गिळून गप्प बसलेले आजवर मी पाहिले आहेत.
राजकारणी एकमेकांवर पक्ष म्हणून वैचारिक वाद म्हणून एकमेकांना टीका करतील. पण आता तरुणांनी पण खरंच जो सत्तेत आणि रस्त्यावर लढेल त्यालाच साथ देईल एवढं तरी पुढच्या काळत नक्कीच होईल.
पण आदरणीय मायावती यांनी उलट आपल्या समाजातील एक नवीन नेतृत्व उदयाला आलं आहे त्याला आपल्या मार्गदर्शनाने आजून कसे चांगले काम त्याच्या काडून करण श्यक्य आहे हे कधी एकत्र बसून चर्चा केली असती तर आजून चांगलं झालं असतं.
लढणाऱ्याला बळ दिल तर त्याला आजून काम करण्याचा हुरूप येतो पण आपणही लढायचं नाही आणि जो लढतोय त्याच्या लढण्याच्या पद्धतीत चुका शोधत राहायचं हे मात्र चुकीच आहे.
सत्ता फक्त जर प्रवचन देऊन, शांततेने बसून, फक्त कोर्टात जाऊन लढायची असती तर मग कामगार कायद्यात मोर्चे काढायचा, सरकारी नोकरदारांनी संप करायचा कायदाच संविधानात बाबासाहेबांनी टाकला नसता.
मग जे संविधानात आहे ते जो कोणी आपल्या रोजच्या जीवनात आपल्या जगण्यात आणि आचरणात आणत असेल तर त्याला आपण चुकीचं म्हणणं म्हणजे आपल्याला आता संघर्ष करण्याची एकतर इच्छा नसेल, किंवा आपल्याकडे संघर्ष करण्यासारखी तरुण कार्यकर्ते नसतील.
नुसतं चार भिंतीच्या आत चर्चा करून मला नाही वाटत की माननीय कांशीराम यांनी सत्तेत आपले दावेदार पाठवले असतील ज्यातील आपण स्वतः आहात मायावातीजी…!!
आपला,
विजय उत्तमबाई कांबळे
संपादक





