युद्धाचा भडका! सोन्याचे दर गगनाला भिडणार, तर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होणार मोठी वाढ?


नवी दिल्ली/मुंबई : निर्भीड समाचार News Desk

मध्यपूर्वेत इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या ताज्या लष्करी संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. इराणने अमेरिकन युद्धनौकेवर केलेला हल्ला आणि त्यानंतर अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर या संघर्षाने भीषण वळण घेतले आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल वाढल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

Advertisement

जेव्हा जेव्हा जागतिक स्तरावर राजकीय किंवा लष्करी अस्थिरता निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसा काढून सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. या युद्धामुळे सोन्याचे दर प्रति १० ग्रॅममागे लवकरच एका नव्या विक्रमी पातळीवर पोहोचू शकतात, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी वर्तवला आहे. इराण आणि मध्यपूर्वेतील देशांकडून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा हा जगासाठी महत्त्वाचा आहे. युद्धाच्या भीतीमुळे ‘ब्रेंट क्रूड’च्या किमती प्रति बॅरल ९० ते १०० डॉलर्सच्या पार जाण्याची शक्यता आहे. जर हा संघर्ष लांबला, तर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होऊन महागाईचा भडका उडू शकतो.

युद्धामुळे अनेक देशांनी आपली हवाई हद्द (Airspace) बंद केल्याने विमान प्रवासासाठी लांबचे मार्ग निवडावे लागत आहेत. परिणामी इंधनाचा वापर वाढून विमान तिकीट दरही कडाडले आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x