प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका


वीर हनुमान चाळ, क्रांती नगर, कांदिवली पूर्व मुंबई ४००१०१ या ठिकाणी प्रभाग क्रमांक ३८ मध्ये निवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे केमिकल कंपन्या चालविल्या जात आहेत. ज्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या कारखान्यातून निघणाऱ्या केमिकलचा धूर हा हवेत सोडला जात असल्यामुळे वायुप्रदूषण तसेच या कारखान्याचे दूषित पाणी हे लगतच असलेल्या पोईसर नदीच्या पात्रात सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. येथील स्थानिक रहिवाश्यांच्या म्हणण्यानुसार या कारखान्यांवर पूर्वी देखील कारवाई करण्यासाठी चे अर्ज देण्यात आले होते, परंतु संबंधित कारखानदारांनी पैशाच्या जोरावर सर्वांना Manage केल्यामुळे हे प्रकरण या ठिकाणी थांबवण्यात आले.

Advertisement

कारखान्याला वापरण्यात येणारे पाणी हे चोरीच्या माध्यमातून वापरण्यात येत असून पाण्याचा प्रेशर जास्त येण्यासाठी मोटर देखील लावण्यात येते. त्यांच्या या कृतीमुळे इतर लोकांच्या वीज बिलामध्ये भरमसाठ वाढ होत असल्याचे सांगण्यात आले आहे. जर कोणी व्यक्ती याचा जाब विचारण्यास गेला तर संबंधित व्यक्ती त्यांच्याशी भांडण करतात आणि जर का एखाद्याने तक्रार केलीच तर पोलिस आणि महानगर पालिकेतील जल अधिकारी यांना पैसे देऊन Manage केले जाते. त्यामुळे संबधित कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणी एक दक्ष नागरिक म्हणून निलेश नवगिरे यांनी केली आहे.

पी नॉर्थ वॉर्ड बृहन्मुंबई महानगरपालिका लिबर्टी गार्डन मालाड पश्चिम मुंबई येथील जल विभाग, इमारत आणि कारखाने, सहायक आयुक्त, वॉर्ड ऑफिसर यांचा यांना आशीर्वाद आहे. हे अधिकारी कोणत्याच तक्रारीला दाद देत नाहीत. आता यावर प्रशासन काय कारवाई करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x