जातीनिहाय खासदारांची यादी


देशात लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत भाजप पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला. या निवडणुकीत महायुतीला अवघ्या १७ जागांवर, तर महाविकास आघाडीला तब्बल ३० जागांवर यश मिळालं आहे.

राज्यातील नवनिर्वाचित ४८ खासदारांपैकी २६ खासदार हे मराठा समाजाचे, तर ९ खासदार हे ओबीसी समाजाचे आहेत. याशिवाय अनुसूचित जातींचे ६ आणि अनुसूचित जमातींचे ४ खासदार निवडून आले आहेत.

वर्ष गायकवाड या अनुसूचित जातीच्या असल्या तरी त्या खुल्या मतदारसंघातून विजयी झालेल्या एकमेव उमेदवार ठरल्या आहेत. राज्यात नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांची संख्या अधिक राहिली आहे. यावेळीही तेच चित्र दिसून आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा ठरला होता.

मराठा समाजाचे खासदार :

Advertisement

उदयनराजे भोसले, शाहू छत्रपती, डॉ. शोभा बच्छाव, नारायण राणे, श्रीकांत शिदि, स्मिता वाघ, नरेश म्हस्के, विशाल पाटील सुप्रिया सुळे, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, धैर्यशील मोहिते, अरविंद सावंत, धैर्यशील माने, संजय देशमुख, प्रतापराव जाधव, राजाभाऊ वाजे, बजरंग सोनवणे, निलेश लंके, संदीपान भुमरे, वसंत चव्हाण, नागेश आष्टीकर, डॉ. कल्याण काळे, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय जाधव, अनुप धोत्रे.

ओबीसी समाजाचे खासदार :

डॉ. अमोल कोल्हे, सुनील तटकरे, रवींद्र वायकर, रक्षा खडसे, प्रतिभा धानोरकर, डॉ. प्रशांत पडोळे, सुरेश म्हात्रे, अमर काळे, संजय दिना पाटील.

अनुसूचित जमातींचे खासदार :

भास्कर भगरे, डॉ. हेमंत सावरा, डॉ. नामदेव किरसान, गोवाल पाडवी.

अनुसूचित जातींचे खासदार :

भाऊसाहेब वाकचौरे,, डॉ. शिवाजी काळगे, वर्षा गायकवाड, श्यामकुमार बर्वे, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x