“MDACS” आणि “गौरव” या सामाजिक संस्थेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन..!!
मुंबई : आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी “Mumbai Districts AIDS Control Society” आणि “गौरव” या सामाजिक संस्था (NGO) यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाजूला करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या तपासणी शिबिराचा मुख्य उद्देश हा HIV पॉजिटिव निघालेल्या रुग्णांना महानगर पालिकेच्या दवाखान्या मधे जाऊन योग्य उपचार कसे घ्यावे याविषयी मार्गदर्शन करतात. मुंबई मधे बऱ्याच ठिकाणी या संस्थेद्वारे अशा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते असे या संस्थेचे प्रोग्राम मॅनेजर निमेश गोरड यांनी सांगितले.
सदर शिबिरावेळी BMC चे महिला अधिकारी शेजला गवानकर मॅडम, गौरव संस्थेचे डॉ. विजय पासी, आरोग्य कर्मचारी रिषिकेश, अंकित, विश्वास, आणि समीर शेख उपस्थित होते.





