कुरार पोलीस ठाणे मालाड येथील जातीवादी पोलिसांच्या कृत्याचा जाहीर निषेध..!!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
दि. ०७/०१/२०२५ रोजी आंबेडकर नगर येथील बाबासाहेबांची विटंबना प्रकरणातील समाजकंटक फरार आरोपी कुरार पोलिसांच्या मेहरबानीमुळे विभागातच मोकाट फिरत होते. तेव्हा त्यांनी अजून एका दलित महिलेला (वंदना गायकवाड) जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी सदर दलित महिला गुन्ह्याची नोंद करण्यासाठी कुरार पोलिस स्टेशनला गेली असता कुरार पोलिसांनी पीडित महिला असुशिक्षित असल्याचा फायदा घेवून पीडित महिलेची NC दाखल करून तिला घरी जावयास सांगितले. त्याचवेळी बाबासाहेबांची विटंबना करणारी फरार आरोपी स्वतः देखील कुरार पोलीस ठाणेस गेली. ही बाब ऍड. दीपक जगदेव यांनी पोलिस निरीक्षक आणि ACP यांना कळवली. तरी देखील मेहरबान पोलिसांनी आरोपीला फरार होण्यास मदत केले. त्यानंतर पीडित महिलेला कळाले कि पोलिसांनी आपली दिशाभूल केली आहे. तेव्हा सदर महिलेने रितसर लेखी अर्ज केला. तरी देखील कुरार पोलीस ठाणेतील API संजय घोळवे यांनी महिलेला वारंवार दिवसा व रात्री चौकशीसाठी बोलावले. तिला मानसिक त्रास दिला, तिच्यावर दबाव टाकला व तिला मूर्ख बनवून तिची फसवणूक केली. त्यानंतर अधिक काळ असाच गेल्यानंतर PSI अभिषेक बोंबे यांनी आरोपीला वाचवण्यासाठी पीडित महिलेला रात्री दहा च्या सुमारास पोलिस ठाणेस बोलावून घेतले आणि बोंबेनी स्वतःच्या मर्जीने जबाब नोंद केला आणि जबरदस्ती त्यावर पीडित महिलेची स्वाक्षरी घेतली आणि जबाबाची प्रत हातात देवून पीडित महिलेला FIR झाली असे बोलून जावयास सांगितले.
कुरार पोलिस, API संजय घोळवे, PSI अभिषेक बोंबे यांनी बाबासाहेबांची विटंबना करणाऱ्या आरोपीला पूर्ण मदत केली व वाचवण्याचा प्रयत्न केला. वरील सर्व बाब DCP, ACP यांना देखील कळवली तरी देखील त्यांनी सुद्धा आरोपीला मदत केली आणि आरोपीचा जामीन झाला आहे अशी खोटी माहिती आंबेडकरी जनतेला दिली. वंदना गायकवाड अद्याप न्यायासाठी पोलीस ठाणे मध्ये चकरा मारत आहे. पोलिसांनी दलित महिलेवर अत्याचार केला. आरोपी सारखी वागणूक दिली. सदर घटनेला २५ दिवस होऊन देखील आरोपीला अटक केली नाही याचा पूर्ण पुरावा आहे असे ऍड. दीपक जगदेव यांचे म्हणणे आहे. API संजय घोळवे यांची ऑडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे की कसे त्यांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला, असेही जगदेव यांचे म्हणणे आहे..
दिनांक १२/०२/२०२५ रोजी बाबासाहेबांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाचा जामीन अर्ज मा. न्यायालय यांनी फेटाळला तरी देखील पोलिस आरोपीला अटक करत नाही. बाबासाहेबांची विटंबना करणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी तसेच आरोपीला मदत करण्यासाठी API संजय घोळवे या भ्रष्ट व जातीवादी अधिकारीने वंदना गायकवाड या दलित महिलेला वारंवार दिवसा व रात्री पोलिस ठाणेस बोलावून नाहक त्रास दिला. त्यांचा अपमान केला. कोर्टाची भिती दाखवून टाळाटाळ केली. या अधिकारीला तात्काळ निलंबित करून त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी ऍड. दीपक जगदेव यांनी केली आहे.
बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या आरोपीला मदत करण्यासाठी API घोळवे यांनी दिनांक ०४/०२/२०२५ रोजी रात्री दहा वाजता वंदना गायकवाड यांना पोलिस ठाणे मध्ये बोलावून घेतले. PSI बोंबे यांनी स्वतःच्या मर्जी प्रमाणे जबाब नोंद करून सही करण्यास दबाव टाकला आणि सदर जबाबाची प्रत देवून FIR झाली असे सांगून घरी जावयास सांगितले. सदर महिलेची दिशाभूल केल्याप्रकरणी जातीवादी आणि भ्रष्ट अधिकारी API संजय घोळवे व PSI बोंबे यांच्यावर अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा नोंद करून अटक करण्याची मागणी ऍड. दीपक जगदेव यांनी केली आहे.
कुरार पोलीस ठाणे मालाड येथील जातीवादी पोलिसांच्या कृत्याचा जाहीर निषेध करत ऍड. दीपक जगदेव यांनी मा. गृहमंत्री यांना खालील विशेष मागण्या केल्या आहेत.
प्रकरण (1) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना प्रकरणात….
1) आरोपी गौतम विश्वकर्मा व त्याचे साथीदार यांना तात्काळ अटक करा.
2) सदर घटनेतील मास्टर माईंड असन्याची शक्यता असणारे माजी नगरसेवक वैभव भरडकर (शिंदे गट) यांना सहआरोपी करा.
3) या प्रकरणात निष्काळजीपणा करून आरोपीला मदत करणारे तपास अधिकारी ACP कैलास बर्वे यांना निलंबित करा व यांचा मो. CDR काढून सखोल चौकशी करा.
4) आरोपीला वाचवणारे, मदत करणारे तसेच फरार करणारे वपोनि जनार्दन परबकर कुरार पोलीस ठाणे यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा नोंद करा.
5) कुरार पोलिस कोणाला वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत याची सखोल चौकशी करून यांचा CDR काढण्यात यावा.
प्रकरण (2) :
1) वंदना गायकवाड यांच्या म्हणण्या प्रमाणे जबाब नोंद करून अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करा.
2) वंदना गायकवाड यांचा अपमान करणारे, गुन्हा नोंद करण्यासाठी हयगय करणारे तसेच पीडित महिलेला त्रास देणारे वपोनि जनार्दन परबकर, API संजय घोळवे, PSI अभिषेक बोंबे यांच्यावर कलम 4(1), 3(1) ससा, ST व 199 BNS नुसार गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा.
3) कुरारचे वपोनि जनार्दन परबकर, API संजय घोळवे, PSI अभिषेक बोंबे यांना निलंबित करून त्यांचा मो. CDR काढण्यात यावा.





