बारामती तालुक्यातील चोरीचे सत्र काही थांबेना होळ येथील ढगाईदेवी मंदिरामधील दानपेटीतील रक्कम केली लंपास


मुख्य संपादक :-सोमनाथ पारसे

*बारामती तालुक्यातील चोरीचे सत्र काही थांबेना होळ येथील ढगाईमाता मंदिरातील दानपेटीतील रक्कम केली लंपास
मंगळवार दि.28/01/2024 सायंकाळी 07.00 ते दि.29/01/2024 सकाळी 07.00 या दरम्यान गुन्हा घडला
(बारामती- होळ) बारामती तालुक्यातील भक्तगणांचे श्रद्धास्थान असणारे ढगाईदेवी मंदिरामध्ये पुन्हा एकदा चोरीचा प्रकार घडला आहे. सविस्तर माहिती असी की वर नमुद केलेल्या तारखे वेळेस यातील कोणीतरी अज्ञात चोरट्याने खिडकीचे ग्रील कशाच्या तरी साह्याने उचकटून त्याद्वारे मंदिरामध्ये प्रवेश करुन मंदिरामधील दानपेटीचे कुलूप तोडून महिनाभरात भाविकांनी दान केलेली त्यातील अंदाजे 1000/- रु रोख रक्कम फिर्यादीचे संमतीशिवाय कोणीतरी अज्ञात चोरटेने चोरी करून नेली आहे. अशी फिर्याद श्री. केशव धोंडीराम शिरसागर वय-47 व्यवसाय- पुजारी रा. वडगाव निंबाळकर ता.बारामती जि.पुणे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरटे विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोसई लवटे करीत आहेत.

Advertisement

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x