नाशिकच्या राजकारणात ट्विस्ट


 

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. तीन टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे. सोमवारी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच नाशिकच्या राजकारणात मोठं ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अजित पवार गटातील नेते विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आमदार नरहरी झिरवळ हे शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरेंच्या प्रचारात पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नरहरी झिरवळ हे सध्या दिंडोरीचे विद्यमान आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत.

Advertisement

राष्ट्रवादीत फुट पडली तेव्हा झिरवळ यांनी अजित दादांना साथ दिली होती. मात्र, आता ते शरद पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरेंच्या प्रचारात सहभागी झाल्याने त्यांची नेमकी भूमिका काय आणि ते कुणाच्या बाजूने आहेत, याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.

झिरवळ शरद पवारांच्या तंबूत दिसून आल्याने नाशिकच्या राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे.  त्यांचे सभेतील फोटो देखील व्हायरल झाले आहेत. त्यांच्या भूमिकेबाबत आता वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x