अमित शहांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल


वसई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी वसईच्या सनसिटी मैदानात सभा घेतली. या सभेदरम्यान अमित शहा यांनी काँग्रेस पक्षासह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दहशतवादी कसाबला पाठीशी घालणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेसाठी हातमिळवणी केली असून ते काँग्रेसच्या मांडीवर बसले आहेत. असे करताना उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही का? अशा शब्दांत अमित शहा यांनी हल्लाबोल केला आहे. भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विवेक पंडित, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार राजेंद्र गावित यांच्यासह इतर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सभेदरम्यान अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख खऱ्या शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री असा केला. .

Advertisement

अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीला देशाची चिंता नाही. सोनिया गांधी या केवळ आपल्या मुलाला म्हणजेच राहुल  गांधींना देशाचे  पंतप्रधान करण्याची स्वप्ने पाहत आहेत. दुसरीकडे शरद पवार हे सुप्रिया सुळेंना, उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंना, लालूप्रसाद यादव आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र केवळ नरेंद्र मोदीच देशाच्या विकासासाठी धडपडत करताना दिसत आहेत असेही अमित शहा यावेळी म्हणाले आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x