मुंबई सेंट्रल RPF निरीक्षक संजीव पांडे यांचा खोटारडेपणा “निर्भीड समाचार” चे संपादक किसन गायकवाड यांच्याकडून उघड!


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या अधिकृत ‘CPGRAMS’ पोर्टलवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी अत्यंत खोटा आणि बनावट अंतरिम अहवाल सादर करणारे वेस्टर्न रेल्वेचे (मुंबई सेंट्रल लोकल) आरपीएफ (RPF) निरीक्षक संजीव पांडे यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. या प्रकरणाची केंद्र सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, ‘CPGRAMS’ यंत्रणेच्या माध्यमातून वांद्रे टर्मिनलचे (Bandra Terminus) आरपीएफ निरीक्षक श्री. जगदीश प्रसाद जाट यांना या संपूर्ण घोटाळ्याची अधिकृत चौकशी करण्याचे थेट आदेश दिले आहेत. केंद्र सरकारच्या या कडक निर्देशानंतर तक्रारदार आणि निर्भीड पत्रकार श्री. किसन राम गायकवाड यांनी २७ जून २०२६ रोजी वांद्रे टर्मिनल येथील आरपीएफ कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून आपला सविस्तर जबाब नोंदवला असून, निरीक्षक संजीव पांडे यांच्या खोटारडेपणाचे डिजिटल पुरावे चौकशी समितीसमोर सादर केले आहेत.

“धक्कादायक बाब म्हणजे, रेल्वे सुरक्षा दलातील (RPF) अंतर्गत बदली (Transfer) संदर्भातील गैरव्यवहाराबाबत पत्रकार किसन राम गायकवाड यांनी केंद्र सरकारच्या ‘CPGRAMS’ पोर्टलवर अधिकृत तक्रार नोंदवली होती. केंद्रीय यंत्रणेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असता, रेल्वे प्रशासनाने या संपूर्ण गंभीर प्रकरणाच्या तपासाची मुख्य जबाबदारी मुंबई सेंट्रलचे आरपीएफ निरीक्षक संजीव पांडे यांच्याकडेच सोपवली होती. मात्र निरीक्षक संजीव पांडे यांनी तपासाचे नाटक करत शासकीय पोर्टलवर पूर्णपणे खोटा आणि बनावट अहवाल सादर केला. मात्र, संविधानाच्या मार्गाने लढणाऱ्या सजग पत्रकाराने वांद्रे टर्मिनल आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश प्रसाद जाट यांच्यासमोर थेट डिजिटल पुरावे सादर करत संजीव पांडे यांचा हा कुटील खोटारडेपणा उघड पाडला आहे.”

केंद्र सरकारचे थेट आदेश आणि वांद्रे आरपीएफची धडक कारवाई
पत्रकार किसन राम गायकवाड यांनी निरीक्षक संजीव पांडे यांच्या कर्तव्यातील कसूर आणि खोट्या अहवालाविरुद्ध दिल्ली येथील केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे MORLY/E/2026/0030765 या क्रमांकासह अधिकृत तक्रार नोंदवली होती. केंद्र सरकारने या तक्रारीतील डिजिटल पुराव्यांची दखल घेत स्थानिक प्रशासनाला तात्काळ चौकशीचे आदेश दिले. या आदेशानुसार वांद्रे टर्मिनलचे आरपीएफ निरीक्षक श्री. जगदीश प्रसाद जाट यांनी थेट सूत्रे हाती घेत पत्रकार गायकवाड यांना फोन करून २७ जून २०२६ रोजी जबाब नोंदवण्यासाठी बोलावले. त्यानुसार, गायकवाड यांनी तात्काळ तपास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजेरी लावली आणि शासकीय पोर्टलवर फसवणूक करणाऱ्या वर्दीधारी अधिकाऱ्याचा बुरखा टराटरा फाडला.

Advertisement

डिजिटल पुराव्यांच्या आधारे ‘संजीव पांडे’ यांचा पर्दाफाश
२७ जून रोजी नोंदवलेल्या अधिकृत जबाबात पत्रकार किसन राम गायकवाड यांनी निरीक्षक संजीव पांडे यांच्या खोट्या अहवालाचे (False Report) सर्व पुरावे चौकशी अधिकाऱ्यांसमोर सादर केले:

1. ऐनवेळी नोटीस देणे: संजीव पांडे यांनी १९ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता जबाबासाठी हजर राहण्याचे पत्र त्याच दिवशी सकाळी ११:05 वाजता व्हॉट्सॲपवर पाठवून नियम धाब्यावर बसवले होते.

2. व्हाट्सॲप चॅटचा पुरावा: ऐनवेळी नोटीस मिळूनही गायकवाड यांनी सहकार्य दर्शवत संध्याकाळी बोलण्याची तयारी दाखवली, ज्याला पांडे यांनी स्वतः “Ok baat karsakte hai” असा मेसेज करून संमती दिली होती.

3. ‘थँक्स’चा मेसेज आणि खोटा अहवाल: १९ जून रोजी संध्याकाळी दोघांमध्ये फोनवर सविस्तर चर्चा झाली आणि स्वतः संजीव पांडे यांनी गायकवाड यांना “Thanks for talking” असा आभाराचा मेसेज पाठवला. असे असूनही, पांडे यांनी रजेवर जाण्यापूर्वी २० जून रोजी “तक्रारदार सहकार्य करत नाही आणि मुंबईबाहेर आहे” असा अत्यंत खोटा आणि बनावट अहवाल सरकारी पोर्टलवर चढवला.

तपास अधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे आश्वासन
केंद्र सरकारच्या आदेशानुसार चौकशी करत असलेले वांद्रे टर्मिनलचे आरपीएफ निरीक्षक श्री. जगदीश प्रसाद जाट यांनी पत्रकार गायकवाड यांचा अधिकृत जबाब आणि व्हॉट्सॲप चॅटचे सर्व डिजिटल पुरावे अत्यंत गांभीर्याने तपासून घेतले. तपास अधिकारी जाट यांनी या प्रकरणात पुढील कडक कायदेशीर चौकशी करण्याचे पूर्ण आश्वासन दिले आहे. तसेच, शासकीय पोर्टलवर खोटी माहिती देऊन रेल्वे विभागाची प्रतिमा मलिन करणाऱ्या निरीक्षक संजीव पांडे यांच्यावर कठोर विभागीय व दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या ही तक्रार वरिष्ठ सुरक्षा आयुक्त (Sr. DSC) संतोष कुमार सिंग राठोड यांच्या देखरेखीखाली ‘Under Process’ असून, केंद्र सरकारच्या निर्देशानंतर वांद्रे आरपीएफने सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे रेल्वेतील भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘निर्भीड समाचार’ या प्रकरणाचा अंतिम कारवाईपर्यंत पाठपुरावा करत राहील.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x