“भाजपच्या पराभवाला फडणवीस जबाबदार”


लोकसभा निवडणुकीचा निकाल पार पडल्यानंतर महाविकास आघाडीला राज्यात अपेक्षेहून चांगली मतं मिळाली असून सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने राज्यात ३० जागांवर मुसंडी मारली आहे. तर महायुतीला १७ जागांवर विजय मिळवता आला. अशातच आता शरद पवार गटातील नेत्याने देवेंद्रजींमुळे भाजपचा पराभव झाला असल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपला अपेक्षीत यश मिळालं नसल्याचं कारण हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.

Advertisement

अनिल देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात भाजपचा पराभव झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली हे लोकांना मुळीच आवडलं नाही. यामुळेच राज्यामध्ये भाजप अपयशी ठरलं. मी म्हणालो होतो की राज्यात मोठा चमत्कार होईल. आता तोच चमत्कार झाला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून आले आहेत. तर विदर्भातही मोठं यश मिळालं आहे. आगामी रणनीती ही वरिष्ठ ठरवतील, राज्यात जसा चमत्कार झाला तसाच केंद्रातही व्हायला हवा, अशी अपेक्षा अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.

सध्या भाजपला मंथनाची आवश्यकता आहे. राज्यातील भाजप सरकार जाण्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचं अनिल देशमुख म्हणालेत. एकाबाजूला ४५ प्लस बोलत असताना चिंतन आणि मंथन करणं गरजेचं होतं, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x