व्यावसायिक गॅसच्या किंमतीत कपात


व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर ७२ रुपयांनी कमी केला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कमी करण्याचा हा सलग तिसरा महिना आहे. त्यामुळे आता व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

ऑइल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या म्हणजेच १४.२ किलो गॅसच्या दरात कोणतीही कपात केली नाही. त्यामुळे घरगुती गॅसच्या किमती त्याच कायम ठेवल्या आहेत आणि त्याच्या दरात देखील कोणताही बदल केलेला नाही. IOCL वेबसाइटनुसार, नवीन दर आज १ जून २०२४ पासून लागू करण्यात आला आहे.

Advertisement

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर सलग तिसऱ्या महिन्यात कमी करण्यात आले आहेत. १ महिन्यात तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १९ रुपयांनी कमी केली होती. मे महिन्यात सिलिंडरची किंमत नवी दिल्लीत १७४५.५० रुपये, मुंबईत १६९८.५० रुपये आणि चेन्नईत १९११ रुपये होती.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x